
कळस–धानोरी–लोहगाव पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०१ मध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार अधिक तीव्र झाला आहे. विकास, सुरक्षितता, महिला सशक्तीकरण आणि पारदर्शक प्रशासन या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत भाजप मतदारांपर्यंत थेट पोहोचत आहे. “कामावर विश्वास, नेतृत्वावर भरोसा” या घोषवाक्यासह प्रचार मोहिमेला वेग आला आहे.
या प्रभागात अ गटातून (बटन क्रमांक ५) अनुसूचित जाती – महिला राखीव प्रवर्गातून अश्विनी राहुल (अप्पा) भंडारे या भाजपच्या अधिकृत उमेदवार असून त्यांचे निवडणूक चिन्ह कमळ आहे. जनतेच्या हक्कांसाठी ठामपणे उभे राहून प्रभागाच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रचारादरम्यान घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यात येत असून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, मूलभूत सुविधा, सार्वजनिक सुरक्षा तसेच महिलांसाठी सक्षम योजना प्रभावीपणे राबवण्यावर भर देण्यात येत आहे. पारदर्शक, उत्तरदायी आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणे हे भाजपचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
मतदान गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कमळ या चिन्हासमोर बटन दाबून भाजप उमेदवार अश्विनी राहुल (अप्पा) भंडारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन प्रचारातून करण्यात येत आहे.
Editer sunil thorat




