जिल्हाराजकीय

महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे सदस्य नोंदणी अभियान सुरू…

सुनिल थोरात (हवेली) 
पुणे : विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आठही विधानसभा मतदारसंघांत सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार येत आहे.
            भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, वर्षा तापकीर, सुभाष जंगले, राघवेंद्र मानकर, प्रमोद कोंढरे, राजेंद्र शिळीमकर, राहुल भंडारे, महेश पुंडे, गणेश कळमकर, सुशील मेंगडे यांच्यासह माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           पुणे शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कमीत कमी ५० हजार सदस्य तसेच प्रत्येक प्रभागात कमीतकमी १० हजार सदस्य नोंदणीचा संकल्प करण्यात आला असून, या अभियानाचे प्रमुख म्हणून पुणे शहर सरचिटणीस राघवेंद्र ऊर्फ बापू मानकर यांची निवड केली आहे.
           याबाबत शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत, शाश्वत विकासाला प्राधान्य देत जनतेने भारतीय जनता पार्टीला प्रेम दाखविले आहे. सामान्य नागरिक भाजपशी जोडू इच्छित आहे, त्यामुळे पक्षाने राष्ट्रीय स्तरावर सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरामध्ये सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करील, असा विश्वास आहे.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??