क्राईम न्युज

आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना सतीश वाघचे मारेकरी अजून मोकाट…

सुनिल थोरात (हवेली)
पुणे : हडपसर येथील भाजपचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे फुरसुंगी फाटा येथून काल सकाळी पहाटेच्या सुमारास तीन ते चार जणांनी चारचाकी वाहनातून अपहरण केल्याची घटना घडली होती.
            प्रकरणाच तपास सुरू असताना यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतीश वाघ यांचा काल मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली.
            या घटनेप्रकरणी अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील म्हणाले की, सतीश वाघ यांच्या हत्येच्या घटनेची पुणे पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. या आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना झाली आहेत. तसेच तात्रिक माध्यमातून देखील तपास सुरू आहे. कोणत्या कारणातून सतीश वाघ यांची हत्या झाली, हे सांगता येणार नाही. त्याचबरोबर सतिश वाघ यांना उचलल्यानंतर काही वेळात मारले असल्याचा प्राथमिक अंदाज असून बंदुकीचा वापर केल्याचे दिसत नाही. तीक्ष्ण हत्याराने मारल्याची शक्यता आहे आणि या प्रकरणातील आरोपी सायंकाळपर्यंत ताब्यात येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??