सुनिल थोरात (हवेली)
पुणे : चारचाकी खासगी वाहनाकरिता एमएच १२ एक्सक्यु या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन आरक्षित करण्याकरिता १३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून फेसलेस सुविधा सुरु होणार आहे; ऑफलाईन पद्धतीने पसंती क्रमांक शुल्क स्वीकारले जाणार नाहीत, असे पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
पसंती क्रमांक आरक्षीत करण्याकरिता https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर, नाव व आधार संलग्नित मोबाईल क्रमांक टाकून नाव नोंदणी करावी व त्यानंतर अर्ज व शुल्क भरणा करून पसंती क्रमांक आरक्षित करता येईल, असेही कळविले आहे.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा