सुनिल थोरात (हवेली)
पुणे : उद्योग संचालनालय, उद्योग, उर्जा व कामगार विभागामार्फत ‘निर्यातदारांचे एक दिवसीय संमेलन’जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली १३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वा. द्वारा मे. गॅबेरिएल इंडिया लि. २९, माईलस्टोन, पुणे-नाशिक महामार्ग, मौजे कुरुळी, ता. खेड, येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या संमेलनात निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादन, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबधित उपक्रमांचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधीकामकाज करणारे घटक, संशोधक, बँकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक वृषाली सोने यांनी दिली आहे.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा