सुनिल थोरात (हवेली)
पुणे (हडपसर) : जेएसपीएम संचलित जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी डी फार्म च्या विद्यार्थ्यांचे नुकतेच इंडक्शन प्रोग्राम आणि पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन केले होते.
त्याप्रसंगी पालक आणि शिक्षक विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. प्रफुल्ल आडकर म्हणाले की आजच्या या धकाधकीच्या जीवनात पालकांना आपल्या पाल्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही कारण प्रत्येकाच्या गरजा वाढल्या आहेत आणि त्याच्या पूर्ततेसाठी पालक पुरेपूर मेहनत करतात परंतु विद्यार्थ्यांच्या प्रत्येक कृतीकडे लक्ष देण्यासाठी शिक्षकांनी सुद्धा डोळसपणे काम करणे गरजेचे आहे.

प्रमुख पाहुणे शिक्षणतज्ञ प्राचार्य डॉ खुशाल मुंढे हे उपस्थित होते त्यांनीही या डिजिटल युगामध्ये भविष्यात आपणाला चांगल्या संधी मिळवायचे असतील तर पालकांनी केलेले कष्ट आणि शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे अंगीकारले पाहिजे तरच सकारात्मक परिवर्तन घडवून येईल
व्यासपीठावर पालक प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष गिरीराज सावंत, संकुल संचालक डॉ. संजय सावंत डॉ. वसंत बुगडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रमांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन करण्यात आला तसेच आदर्श पालक म्हणूनही या कार्यक्रमात विद्यार्थी पालकांनी आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी पोकळे या विद्यार्थिनीने केले.

प्रास्ताविक प्राचार्य डॉ आडकर सर यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे डॉ खुशाल मुंढे यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा. निकिता कोलते यांनी केले. पालक सभेला पालकांचा उस्फुर्त सहभाग लाभला. नानासाहेब मोरे यांनी पालक प्रतिनिधी म्हणून आपले मनोगत व्यक्त केले. अश्विनी साळुंखे समीर शेख या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक अनुराधा पाटील यांनी केले तसेच प्रा.स्वप्नील गाडेकर, प्रा. रविराज जाधव, प्रा. निकिता कोलते, प्रा.सागर सोनार, प्रा. अमृता कस्तुरे, प्रा. प्रगती लगदिवे, स्वप्नाली सावंत, प्रियांका महाजन, क्षितिजा डोंबाळे, स्वाती माकोणे, पवार काका, कल्पना सुरवसे, सुनीता गायकवाड यांनी सहकार्य केले.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा