सुनिल थोरात (वार्ताहर)
पुणे (हडपसर) : खेळामुळे शरीर सुदृढ आणि निरोगी राहते. खेळामुळे शारीरिक व मानसिक विकास होतो. जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खिलाडूवृत्तीला चालना देण्यासाठी साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनियर कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या क्रीडामहोत्सवात कबड्डी, गोल खो-खो, डाॅजबाॅल, लंगडी, हे सांघिक खेळ तर १०० मीटर धावणे व लिंबू चमचा, पोत्यातील उड्या, संगीत खुर्ची अशा वैयक्तिक व मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
५ वी ते १२ वी अखेर सुमारे ५००० विद्यार्थ्यांनी या खेळात सहभाग घेतला.
या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आर्यनमॅन डाॅ. शंतनू जगदाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर कोणत्याही एका खेळात आपले कौशल्य वाढवावे. जिद्द, चिकाटी, सातत्य यामुळेच आपण खेळात यश मिळवू शकतो. जीवनात ध्येय बाळगा निश्चित यश मिळेल.
या क्रीडामहोत्सवासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, माधुरी राऊत यांनी मार्गदर्शन केले. तर क्रीडामहोत्सवाचे नियोजन क्रीडाशिक्षक रमेश महाडिक, गणेश निचळे, कोंडिबा टेंगले यांनी केले.

सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले. चित्रा हेंद्रे यांनी खेळ व क्रीडा विषयक रचलेलं गीत सादर केले. क्रीडाशिक्षक गणेश निचळे यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले. यावेळी आजीव सेवक अनिल मेमाणे, ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे, गजेंद्र शिंदे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन अनिल वाव्हळ यांनी केले. तर आभार अश्विनी सावंत यांनी मानले.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा