अवैध प्रवासी वाहतूकवर एक दिवसाची स्टंटबाजी.; लोणी काळभोर..
अवैध प्रवासी वाहतूकिवर पोलीस प्रशासनाने वरिष्ठांना खुश करण्यासाठी एक दिवसाची कारवाई अशी नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चेला उधाण..

पुणे (हवेली) :
पूर्व हवेलीत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून लोणी काळभोर वाहतूक विभागाकडून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात तीन ते चार दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.
तसेच अवैध वाहतुकीवर यापुढे आणखीन कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे लोणी काळभोर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र पवार यांनी कारवाई करून एक प्रकारे गंभीर इशारा दिला होता.
परंतु कवडीपाट टोल नाक्याजवळ लोणी काळभोर पोलिसांनी अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई करण्यास बंद केल्याचे प्राथमिक माहिती समोर येत असून रिक्षा, सिक्स सीटर व चारचाकी प्रवासी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत नसल्याचे स्थानिक नागरिकांची तीव्र नाराजी दिसून येत आहे.
पाठीमागील कारवाई नंतर गाड्यांची कागदपत्रे, गाडी चालविण्याचा परवाना, रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे, ड्रेस कोड, ड्रायव्हिंग परवाना / बॅच, ट्रिपल सीट, राँग साईटने गाडी चालविणे व वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करणे बंद झाले असून अवैध प्रवासी वाहतूक जोमाने चालू असल्याचे सध्या दिसून येते आहे.
आता ना नोटिस, ना कागदपत्रे, ना बॅच तपासणी, ना ड्रेस कोड, ना रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे चेक होत नाही. मनमानी कारभार एखादी घटना घडल्यास जबाबदार कोण? नागरिकांच्या जीवाला जबाबदार कोण? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
अवैध प्रवासी वाहतूक कारवाई…
दरम्यान, पुणे सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाका, कदमवाकवस्ती, लोणी स्टेशन, लोणी काळभोर, थेऊर फाटा, येथुन खासगी वाहनांमधून मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र पवार, याची प्रतिक्रिया घेतली असता.
देवेंद्र पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा लोणी काळभोर
आमची कारवाई चालू असून आज बंदोबस्तात असल्याने कारवाई आज नाही. मनुष्य बळ कमी असल्याने कारवाई करता येत नाही.
संजय सुर्वे, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा
कारवाई होत राहणार यात शंका नाही संबंधित अधिकारी यांना कारवाई संदर्भात सुचना देण्यात आल्या आहेत. अवैध वाहतूक ही कायद्याने चुकीचे आहे कडक कारवाई नक्की होणार..



