जिल्हा
बंदुक परवाना धारकांची होणार पडताळणी; पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींची माहिती..
खरोखर आवश्यकता तपासणार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींची माहिती..

पुणे: स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना घेऊन बंदूक सोबत बाळगली जाते. विशेष म्हणजे, या पिस्तुलाचा उपयोग प्रत्यक्षात करण्याची गरज भासत नाही.
यात वापरलेल्या प्रत्येक गोळीचा हिशेब द्यावा लागतो. आपल्याकडे बंदूक असल्यास लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे बंदूक परवाना मिळविण्यासाठी आटापिटा केला जातो. तर गेल्या काही दिवसांपासून परवना असलेल्या बंदुकीचा गैरवापर होत आहे, त्याकडे माहिती पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, जिल्ह्यातील परवानाधारक बंदुकबाज याची पडताळणी केली जाईल, त्यांना आज खरेच शस्त्राची गरज आहे का, हे पाहिले जाईल.
साताऱ्यात जिल्हाधिकारी असतांना आदर्श शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र तयार केले होते. हाच सातारा पटर्न जिल्ह्यातही राबविण्यात येणार असल्याचा मानस नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला. यावेळी बोलतांना डुडी म्हणाले की, आदर्श शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकल्प प्रायोगिक तत्वावर नाही तर संपूर्ण जिल्ह्यात राबविणात येणार आहे.
जिल्हा नियोजन समितीतील निधी बरोबर शासनाच्या विविध योजनांच्या निधीचा वापर करण्यात येणार आहे लाभ घेण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या मदतीने प्रत्येक गावात एक आदर्श शाळा निर्माण करण्यात येणार आहे. एका शाळेत ५०० विद्यार्थी आणि कमीतकमी १५ शिक्षक असतील. आदर्श शाळेत पायाभूती सुविधा निर्माण करणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे हे मुख्य धोरण असणार आहे. या शाळांमध्ये शिक्षणाबरोबर क्रिडा, सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थी पुढे जायला हवे.
लाचप्रकरणी कारवाईचा अहवाल शासनाला : जितेंद्र डुडी
जिल्हा परिषदेचे लाचखोर माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आणि अधिक्षक विजयकुमार सोनवणे यांच्यावर कारवाईची शिफारस करणारा अहवाल शासनाला पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी (Jitendra Dudi) यांनी दिली. माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आणि अधीक्षक विजयकुमार सोनवणे यांना दोन दिवसापूर्वी एक लाख ७० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते.
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
👉🏻”द पाॅईंट न्युज 24″- https://thepointnews24.in/
👉🏻फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
👉🏻ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
👉🏻इन्स्टाग्राम – https://www.instagram.com
👉🏻डेलीहंट पेज – https://profile.dailyhunt.in/sunil24
👉🏻वाॅटसअप ग्रुपला अॅड होण्यासाठी – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj लिंकवर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.



