क्राईम न्युज

पोलिसांनी सापळा रचून घायळला व कामठे यांना मोठ्या शिताफीने केले जेरबंद : लोणी काळभोर पोलीसांची कारवाई..

तुळशीराम घुसाळकर हवेली

पुणे (हवेली) : लोणी काळभोर : १५ दिवसांपूर्वी जुन्या भांडणाचा राग मनात धरून शेतकऱ्याच्या डोक्यात कोयता घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून फरार झालेले अट्टल गुन्हेगार सोन्या घायाळ व अविनाश कामठे यांना जेरबंद करण्यात लोणी काळभोर पोलिसांना अखेर यश आले आहे.

           सदर घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वडाळे वस्ती परिसरात सोमवार (२३ डिसेंबर) रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली होती. यांतील मुख्य सुत्रधार सोन्या घायाळ (वय २९, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) व त्याचा साथीदार अविनाश कामठे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. बुधवार (८ जानेवारी) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर पोलिसांनी मोठ्या शिताफीने सोन्या घायळ याला सासवड येथील पुरंदर सिटी परिसरातून तर अविनाश कामठे याला लोणी काळभोर परिसरातून बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे.

        या प्रकरणी जखमी विजय श्रीरंग काळभोर (वय ४६, रा. रायवाडी, लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यापुर्वी लोणी काळभोर पोलिसांनी गणेश गोडसे व श्रीकांत मेमाणे यांना अटक केली आहे.

      सविस्तर माहिती असी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार (२३ डिसेंबर) रोजी विजय काळभोर हे शेतातील पोल्ट्री फॉर्ममध्ये काम करीत होते. तेव्हा सोन्या घायाळ व त्याचे साथीदार दुचाकीवरून तेथे आले. घायाळ याने काळभोर यांना शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याचे उद्देशाने कोयत्याने डोक्यात वार केले. तसेच त्याच्या साथीदारांनी लोखंडी रॉड व दगडांनी काळभोर यांना मारहाण केली.या मारहाणीत काळभोर हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी विजय काळभोर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेनंतर आहे. त्यानुसार घायाळ व त्याच्या तीन ते चार साथीदारांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय दंड संहिता कलम 109,118 (2),189 (2),189 (4) 190, 352, 351 (3) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142, 37 (1) (3) सह १३५ व क्रिमिनल लॉ. आर्म अक्ट कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून घायळ व कामठे हे दोघे फरार झाला होते.

        सोन्या उर्फ निखिल घायाळ याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर कायद्याचा वाचक बसावा म्हणून पोलीस प्रशासनाने त्याला तडीपार सुद्धा केले आहे. मात्र त्याची गुन्हेगारीवृत्ती अद्यापही थांबलेली नाही. त्याच्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व त्याची गुन्हेगारी मोडीत काढून आरोपीला पकडण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार व पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर यांची पथके पाठवण्यात आली होती.

       सदर पथके ही सोन्या घायाळ व अविनाश कामठे याच्या मागावर होती. तपास करीत असताना, पोलिसांना आरोपी सोन्या हा सासवड येथील पुरंदर सिटी परिसरात येणार असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली. माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून घायळला मोठ्या शिताफीने बुधवारी जेरबंद केले. तर कामठे यालाही पोलिसांनी लोणी काळभोर परिसरातून बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे.

         ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलीस हवालदार केतन धेंडे, गणेश सातपुते, चक्रधर शिरगिरे, तेज भोसले, दिगंबर जगताप यांच्या पथकाने केली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??