महाराष्ट्रसामाजिक
अलर्ट! व्हायरसविरोधी राज्यात टास्क फोर्सची स्थापना, कशी केली जाणार टेस्ट पाहा..

महाराष्ट्र : चीनमध्ये सध्या HMPV व्हायरसने थैमान घातलं आहे. दरम्यान या व्हायरसचे रूग्ण आता भारतात देखील सापडले आहेत. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा श्वसनविषयक आजार जुनाच आहे. त्याचा संसर्ग श्वसनसंस्थेच्या वरील भागात होतो व उपचार न घेतल्यास पुढे पुष्प्फुसामध्ये प्रादुर्भाव होतो.
मुलांमध्ये प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असली तरी तो लक्षणांनुसार दिलेल्या औषधोपचाराने बरा होतो. त्यामुळे पालकांनी याबाबत घाबरून जाऊ नये, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.
वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी सोमवारी राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील अधिष्ठातांची दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांना एचएमपीव्हीवावत माहिती आणि सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शक सूचना आणि उपचारांची दिशा ठरविण्याबाबत कृतिदलाची स्थापना करण्यात आली आहे.
ससून रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर म्हणाल्या, “एचएमपीव्ही हा श्वसनयंत्रणेशी संबंधित रोग आहे. एक वर्षाच्या आतील मुलांमध्ये त्याचं प्रमाण थोडे जास्त असतं. त्याचप्रमाणे मोठ्यांमध्ये ज्यांना इतर आजार आहेत त्यांनाही याचा त्रास होऊ शकतो. याचा संसर्ग मात्र सौम्य ते गंभीर प्रकारचा होऊ शकतो.”
तपासणी कशी केली जाते?
‘एचएमपीव्ही’ची तपासणी घशातील लाळेच्या नमुन्यांद्वारे करण्यात येते
सध्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत ही तपासणी (एनआयव्ही) केली जाते
यासाठी कोणतेही स्वतंत्र प्रतिविषाणू औषध नाही. त्यामुळे लक्षणानुसार औषधे देण्यात येतात.
अजून यावर लसही उपलब्ध नाही.
डॉ. किणीकर म्हणाल्या, कोरोना काळात आपण जी काळजी घेतली होती, तीच स्वच्छताविषयक काळजी घेणं गरजेचं आहे. स्वच्छता बाळगणं, भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. बाळाला लक्षणं दिसत असली, तरी त्याला अंगावर पाजणं गरजेचं आहे. तसेच मुलांना इतर आजारांपासून संरक्षण देणारं लसीकरण करून घ्यावं. सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे सौम्य प्रमाणातच आढळतात. अपुऱ्या दिवसांच्या आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या मुलांमध्ये आजार बळावू शकतो. विषाणूजन्य असल्यामुळे प्रतिजैविकांचा उपयोग नसतो. सर्दी, खोकला, ताप यावर लक्षणानुरूप औषधोपचार करावे लागतात, असं भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग यांनी सांगितलंय.
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
👉🏻”द पाॅईंट न्युज 24″- https://thepointnews24.in/
👉🏻फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
👉🏻ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
👉🏻इन्स्टाग्राम – https://www.instagram.com
👉🏻डेलीहंट पेज – https://profile.dailyhunt.in/sunil24
👉🏻वाॅटसअप ग्रुपला अॅड होण्यासाठी – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj लिंकवर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.



