सामाजिक

पूर्ण वेळ वाहतूक पोलीसाची मागणी व उपाययोजना न झाल्यास नागरिकांसह रास्ता रोको ; राजे क्लब ट्रस्ट शेवाळवाडी..

नियोजना अभावी शेवाळवाडी चौकात वाढले अपघातांचे प्रमाण; प्रशासनाने दुर्लक्ष... अमित पवार..

पुणे (हवेली) : पुणे सोलापूर रोड येथे शेवाळवाडी चौकामध्ये दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असून प्रशासनाकडून अद्याप ठोस कुठलीच उपाययोजना होताना दिसत नाही. या चौकात प्रशासन जाणीवपूर्वक लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.

शेवाळे वाडीत विरुद्ध दिशेने येणारी वाहने, रोडला फुटपाथची अवस्था गंभीर असून ट्रॅफिक सिग्नलचे पालन होत नाही. यावरून बेशिस्त वाहन चालकांना प्रशासनाचा कोणताही धाक राहिला नाही हे यावरून स्पष्ट होत आहे.

पाठीमागील काही दिवसात शेवाळवाडी भारत पेट्रोल पम्पां समोरील दुभाजक बंद केल्याने सर्व नागरिकांना शेवाळवाडी चौकामध्ये यू-टर्न घेण्यासाठी यावे लागते. या दुभाजकाचे अंतर यु-टर्न घेताना कमी असल्याने या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यावर उपाय योजना म्हणून राजे क्लबच्या वतीने या दुभाजकाचे अंतर (शासन नियमानुसार ५ मीटर) ने वाढवावे अशा मागणीचे पत्र राष्ट्रीय महामार्ग अभियंत्या श्रुती नाईक याना देण्यात आले.

मागील आठवड्यात शेवाळवाडी चौक ५ मिटर ने वाढवावा यासाठी राजे क्लबच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग अभियंत्यांना निवेदन देण्यात आले होते. याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभाग व वाहतुक पोलीस यांच्या वतीने संयुक्तिक पाहणी करण्यात आली.

शेवाळवाडीचे उपसरपंच व शिवसेना युवा नेते अमित पवार.

त्या अनुषंगाने शेवाळवाडी चौकामध्ये पूर्ण वेळ वाहतूक पोलीस नेमण्यात यावा जेणेकरून वाहन चालक नियमांचे पालन करतील व यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल यासाठी पुणे वाहतूक विभागाला ही पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

शेवाळेवाडी चौकात अपघात होऊन ही प्रशासन याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत आहेत यामुळे नागरिकांमध्ये कमालीची नाराजी व प्रशासना विरोधात उदासीनता दिसून येत आहे. येणाऱ्या दोन आठवड्यांमध्ये यावर प्रशासनाने सकारात्मक उपाययोजना न केल्यास नागरिकां समवेत रास्ता रोको करावा लागेल असे शेवाळवाडीचे उपसरपंच व शिवसेना युवा नेते अमित पवार म्हणाले.

पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

👉🏻”द पाॅईंट न्युज 24″- https://thepointnews24.in/
👉🏻फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
👉🏻ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
👉🏻इन्स्टाग्राम – https://www.instagram.com
👉🏻डेलीहंट पेज – https://profile.dailyhunt.in/sunil24
👉🏻वाॅटसअप ग्रुपला अॅड होण्यासाठी – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj लिंकवर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??