क्राईम न्युज

दहावीच्या विद्यार्थिनीची छेड काढत अत्याचार, एका तासात आवळल्या आरोपीच्या मुसक्या ; लोणी काळभोर..

पुणे (हवेली) : लोणी काळभोर येथील घटना क्लासवरून घरी चाललेल्या एका दहावीच्या विद्यार्थिनीची छेड काढून विनयभंगासह अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली.

या गुन्ह्यातील आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या एक तासाच्या आत मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. लोणी काळभोर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

युवराज सोमनाथ सोनवणे (वय २५ रा.धुमाळ मळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १६ वर्षीय पिडीतेच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या अगोदरही आरोपी सोनवणे यांच्या विरोधात भरतीय न्याय दंड संहिता कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल आहे.

पिडीता ही नेहमीप्रमाणे रविवारी क्लासला निघाली होती. त्यावेळी पिडीतेसोबत तिची आई होती. पिडीता ही लोणी काळभोर गावातील कृष्णा मॅचिंग साडीच्या दुकानाजवळ पोहचवली असता, आरोपी युवराज सोनवणे हा पाठीमागून आला. व ‘माझ्याशी बोल, पळून जाऊ’ असे म्हणत छातीला हात लावून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. व निर्भयाच्या आईस हाताने मारहाण करुन शिवीगाळ करून जीव मारण्याची धमकी दिली. असे फिर्यादी ने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी पिडीतेच्या आईने तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले व आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली.

त्यानुसार आरोपीच्या विरोधात विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार व विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला अवघ्या एक तासाच्या आत मोठ्या शिताफीने अटक केली.

            ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार गणेश सातपुते, चक्रधर शिरगिरे व योगेश पाटील यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करीत आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??