पुणे (हडपसर) : हडपसर येथील ग्लायडींग सेंटर हे PPP मॉडेल वर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ला ९९ वर्षाच्या कराराने १ रुपया नाममात्र भाडेतत्त्वावरती देण्याचा निर्णय होत आहे . या निर्णयाविरोधात सावली फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी नगरसेवक योगेश दत्तात्रय ससाणे यांनी या विरोधात सह्यांची मोहीम घेऊन व साखळी उपोषण करून विरोध दर्शवलेला आहे.
याच विषयांमध्ये हडपसरचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाणारे ग्लायडिंग सेंटर चे खाजगीकरण होऊ नये ही भूमिका न्यू इंग्लिश स्कूल मधील सुमारे एक हजार दोनशे शाळकरी विद्यार्थ्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी याना पोस्टकार्ड लिहीली आहेत व विनंती केली आहे.

की मोदी काका आमचे क्लायडिंग सेंटर चे कृपा करून खाजगीकरण होऊ देऊ नका ते सर्व सामान्यांसाठी ठेवावे अशी पत्र प्रत्येक मुलाने स्वतःच्या हस्ताक्षरात माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांना लिहिली आहेत. योगेश ससाणे यांनी अशा प्रकारची २५००० पोस्ट कार्ड विविध शाळाकरी मुलांकडून त्यांना हा विषय समजावून सांगून लिहून घेतली आहेत व सदर ची सर्व पोस्ट कार्ड नरेंद्र मोदीजींना पाठवणे चालू झालेले आहे.

एका सामाजिक उपक्रमांमध्ये शाळकरी मुलांनी पंतप्रधान मोदींना मोदीजींना पत्र लिहिण्याचा पुण्यामधील हा पहिलाच प्रसंग असावा , त्यात मुलांनी उत्स्फूर्तपणे पत्र लेखन केले त्याबद्दल संस्थेचे चेअरमन अजित ससाणे, सेक्रेटरी सचिन ससाणे माजी चेअरमन निलेश ससाणे व सर्व संचालक मंडळ विद्यार्थी व शिक्षकांचे योगेश ससाणे यांनी जाहीर आभार मानले
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा