
पुणे (हवेली) : माळवाडी कवडी पाठ (दि. १ ऑगस्ट २०२५) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी कवडी पाठ येथे प्रेरणादायी व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेचे आणि सामाजिक समतेचे महत्त्व रुजावे या हेतूने विद्यार्थ्यांना बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन राकेश आंगतरावर लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या सदस्य सौ. सिमीता आंगतरावर लोंढे आणि ग्रामपंचायत सदस्य श्री. आकाश काळभोर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थिती दिली.
यावेळी adv. राहुल झेंडे, महेश भोक्से, गणेश थोरात, विशाल यादव, समीर शेंडगे, गणेश ढोके, सचिन घाडगे, नकुल शिंदे यांचाही कार्यक्रमाला मोलाचा सहभाग लाभला.
विद्यार्थ्यांना बिस्कीट वाटप करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्याशी संवाद साधला. शाळेतील मुख्याध्यापक जाधव सर, तसेच शिक्षकवृंद लडकत सर, सौ. म्हेत्रे, सौ. हिंगणे, सौ. बारवकर, सौ. महामुनी यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी माहिती…
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (जन्म: १ ऑगस्ट १९२० – मृत्यू: १८ जुलै १९६९) हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी, लेखक, समाजसुधारक आणि लोककलावंत होते. त्यांचा जन्म सत्ताना (जि. नाशिक) येथे एका मातंग समाजातील कष्टकरी कुटुंबात झाला.
अण्णा भाऊंनी आपल्या लेखणीतून तसेच लावणी, पोवाडा, तमाशा या लोककला माध्यमांतून समाजातील शोषित, दलित व कष्टकरी वर्गाचे दुःख, संघर्ष आणि आत्मसन्मान प्रभावीपणे मांडले. त्यांची लेखनशैली सहज, सडेतोड आणि जनतेशी थेट संवाद साधणारी होती. त्यांची “फकिरा” ही कादंबरी समाजमनावर आजही परिणाम करते. त्यांनी एकूण ३५ कादंबऱ्या, १५ नाटके आणि १० कथासंग्रह लिहिले.
सोविएत रशियामध्ये त्यांच्या साहित्याचे भाषांतर झाले होते, ही बाब त्यांच्या कार्याच्या आंतरराष्ट्रीय दृष्टीकोनाची साक्ष देते.
अण्णाभाऊ साठे हे साहित्यिकच नव्हे तर वंचितांचा बुलंद आवाज होते. त्यांनी सामाजिक समतेचा निर्धार आपल्याच कार्यातून व्यक्त केला.
राकेश आंगतरावर लोंढे, सामाजिक कार्यकर्ते
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी जागरूकता निर्माण झाली, तसेच त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि सामाजिक जाणीवा जागृत करणारे ठरले. यात शंका नाही
Editer Sunil thorat








