शिक्षण

इंदापूर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला संपन्न’..

डॉ गजानन टिंगरे/ पुणे

पुणे (इंदापूर) : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागाच्या वतीने इंदापूर महाविद्यालयामध्ये बॅ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला संपन्न झाली.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे व उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांच्या मार्गदर्शनातून ही व्याख्यानमाला संपन्न झाली.

या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प पुणे येथील स.प. महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रा. रूपाली अवचरे यांनी गुंफले. ‘थोडे हसू आणि थोडे आसू’ या विषयावरती त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या ,’आज हृदयविकाराचे वय हे पंधरा वर्षापर्यंत आलेले आहे , म्हणून सर्वांनाच हसण्याची गरज आहे. ताणतणाव मुक्त जीवन जगणे अत्यंत गरजेचे बनलेले आहे. म्हणून थोडे असू आणि थोडे हसू असेच आपले जीवन असले पाहिजे. दुसरे गुंफण्यासाठी पुणे येथीलच श्री. दशरथ यादव हे उपस्थित राहिले .’साहित्यराजे संभाजी महाराज’या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपले मनोगत व्यक्त करताना ते असे म्हणाले,’ छत्रपती संभाजी महाराज हे केवळ लढवय्येच नव्हते. तर ते साहित्यिक होते. लेखक होते .कवी होते. संस्कृत भाषेवरती संभाजी महाराजांचे प्रभुत्व होते.म्हणून संभाजी महाराजांनी बुधभूषण यासारखे ग्रंथ संस्कृत मधून लिहिलेले आहेत. एकंदरीत तथागत भगवान गौतम बुद्धापासूनची पुरोगामी परंपरा छत्रपती संभाजी महाराजांनी अंगीकारलेली दिसून येते. छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य आज आपणा सर्वांच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन केले’.

या व्याख्यानमालेतील तिसरे पुष्पगुंपण्यासाठी पुणे येथून सिद्धिविनायक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शैलेश त्रिभुवन उपस्थित राहिले. ‘चित्रपटांनी मला घडविले’ या विषयावरती विद्यार्थ्यांना आपले मार्गदर्शन केले. आपले व्याख्यानातून ते असं म्हणाले, ‘चित्रपटांच्याकडे केवळ मनोरंजनात्मक दृष्टीने न पाहता नोकरीतील सेवेच्या संधी म्हणूनही पाहिले पाहिजे. त्यातून आपले जीवन फुलविले पाहिजे. आज विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता चित्रपटाच्या माध्यमातून वेगळी विचारधारा अंगीकारली पाहिजे. अनेक रोजगाराच्या संधी चित्रपट क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. याच्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे विद्यार्थ्यांना दिली.

या व्याख्यानमालेसाठी डॉ. भिमाजी भोर, डॉ. शिवाजी वीर, डॉ. सदाशिव उंबरदंड यांचेही मार्गदर्शन लाभले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??