क्राईम न्युजदेश विदेश

बनावट आधार कार्ड, पारपत्राआधारे गेली दहा वर्षे कापड व्यवसाय सुरू ; पोलिसांनी आवळल्या मुसक्या…पुणे.

पुणे : बनावट आधार कार्ड, पारपत्राआधारे गेली दहा वर्षे बांगलादेशी नागरिक पुण्यात बेकायदेशीर राहून कापड व्यवसाय करत असल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित बांगलादेशी नागरिकाला स्वारगेट पोलिसांनी महर्षीनगर भागात पकडले आहे. त्याच्याकडून बनावट आधार कार्ड, पारपत्र, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड जप्त करण्यात आले. त्याने बनावट कागदपत्रे कशा पद्धतीने मिळवली यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.

           या प्रकरणी एहसान हाफिज शेख (३४, सध्या रा. अरुणा असिफ अली उद्यानाजवळ, महर्षीनगर, गुलटेकडी, मूळ रा. बांगलादेश) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात परकीय नागरिक कायदा कलम १४, पारपत्र अधिनियम, परकीय नागरिक आदेश तसेच बनावट कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार सोमनाथ ढगे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एहसान शेख हा कापड विक्रीचा व्यवसाय करत होता. २०१४ मध्ये त्याने भारतात बेकायदेशीर घुसखोरी केली. त्यानंतर तो पुण्यात वास्तव्याला आला होता. काही वर्षांपूर्वी त्याने कपडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. स्वारगेट पोलिसांच्या पथकाला याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने महर्षीनगर परिसरात सापळा लावून शेखला ताब्यात घेतले.

         एहसान हाफिज शेख याची चौकशी केली असता, त्याच्याकडून बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पारपत्र जप्त करण्यात आले. त्याने बनावट कागदपत्रे कशी मिळवली यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. दरम्यान, पुण्यात पकडण्यात आलेला बांगलादेशी हा प्रथम पश्चिम बंगाल, नंतर विविध ठिकाणी राहून पुण्यात आला होता. अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??