देश विदेश

सत्तापालट…डोनाल्ड ट्रम्प अमेरीका राष्ट्राध्यक्षपदी ; चीन-पाकिस्तानचं वाढलं टेन्शन, भारतासाठी गुडन्यूज..

भारत : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची प्राथमिकता काय आहे ते सांगितलं. ट्रम्प म्हणाले, की आता अमेरिकेत कुणाचीही घुसखोरी होऊ दिली जाणार नाही. ड्रग तस्करांना दहशतवादी मानले जाईल.

        अमेरिकेची सेना आता इतरांच्या युद्धात हस्तक्षेप करणार नाही. तसेच, इतर देश जसा व्यवहार करतील, तसाच व्यवहार आम्ही करू, असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या या भाषणामुळे चीन आणि पाकिस्तानसाठी अडचणी वाढणार आहेत.

                        चीनला थेट इशारा

वृत्तानुसार ट्रम्प यांनी चीनसाठी थेट संदेश दिला की, “आम्ही पनामा कालवा चीनला भेट म्हणून दिला होता. ही आमची मूर्खता होती. आता आम्ही पनामा कालव्यावर पुन्हा कब्जा घेणार आहोत.” पनामा कालवा हा चीन अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. जगातील सुमारे ५ टक्के समुद्री व्यापार याच मार्गाने होतो. ट्रम्प यांना वाटते की अमेरिकेने कालव्याच्या निर्मितीसाठी पैसा आणि श्रम खर्च केले आहेत, त्यामुळे तो अमेरिकेचाच हक्क आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे चीनसोबत संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी जाहीर केले की, दुसऱ्या देशांवरील आयात शुल्क आणि कर वाढवले जाणार आहेत. अमेरिकेतील नागरिकांवर कर लादून इतर देशांना समृद्ध करण्याऐवजी, विदेशातून येणाऱ्या वस्तूंवर कर लावून अमेरिकन नागरिकांना समृद्ध करण्याचा उद्देश त्यांनी व्यक्त केला. यामुळे चीनसोबत कॅनडा आणि मेक्सिकोवरही कर वाढवला जाणार असल्याचे त्यांनी पुनः एकदा स्पष्ट केले. इलेक्ट्रिक वाहन अनिवार्यता रद्द करण्याची घोषणाही त्यांनी केली. यामुळे चीनला मोठा फटका बसू शकतो, कारण अमेरिकेला चीन इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठा बाजार मानतो.

                          पाकिस्तानला संदेश

        पाकिस्तानसाठीही ट्रम्प यांनी अप्रत्यक्ष संदेश दिला. त्यांनी सांगितले की, “आम्ही दहशतवादी संघटनांविरोधात कठोर कारवाई करणार आहोत. ड्रग तस्करांनाही दहशतवाद्यांचा दर्जा दिला जाईल.” तसेच, त्यांनी स्पष्ट केले की, आता कुठल्याही देशाला मोफत मदत देण्यात येणार नाही. अनेक वर्षांपासून अमेरिका पाकिस्तानला “गैर-नाटो सहकारी देश” म्हणून प्राधान्य देत आहे आणि यासाठी दरवर्षी अब्जावधी डॉलर पाकिस्तानला दिले जात आहेत. ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे हे दर्जा लवकरच संपुष्टात येईल, अशी शक्यता आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??