पुणे (हवेली) : (दि.२१) डिसेंबर २०२५ रोजी जे.एस. पी. एम. जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी औषध निर्माणशास्त्र (डी. फार्मसी) प्रथम आणि व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्पिटल व मेडिकल भेटीचे आयोजन करण्यात आले होते. भेट ही निसर्गोपचार आश्रम व प्राथमिक आरोग्य केंद्र उरुळी कांचन येथे घेण्यात आली. पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना रुग्णालयातील कामकाजा विषयी ज्ञान मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी हे रोजगाराच्या दृष्टीने हॉस्पिटलमध्ये औषध निर्माण अधिकारी (फार्मासिस्ट) म्हणून कार्यरत होतात. त्यावेळी त्यांना अडचणी यायला नको व काम कसे करावे तसेच विभागनिहाय कामाचे स्वरूप कसे असते आदी विषयांना लक्षात घेऊन आश्रमला भेट देण्यात आली. निसर्गोपचार आश्रम, उरुळीकांचन हे महात्मा गांधीजींचा वारसा आहे आणि यानी तो मार्च १९४६ , रोजी स्थापन केला आहे. ८ वर्षे विविध उपचार देते आहेत.
निसर्गोपचारच्या तत्त्वांद्वारे आजारावर साधकांवर उपचार करतात. वैयक्तिक उपचारांसह आणि त्यांच्या स्थितीवर आधारित आहार, उपचार पद्धती वर आधारित आहेत. रुग्णालयाचे अधिकारी सतीश सोनावने यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी रुग्णालयातील विभागानुसार विभागांची माहिती जाणून घेतली तसेच डायरेक्टर डॉ. अभिषेक देवीकर यांनी आधुनिक आरोग्य सेवा प्रणाली व साहित्यांची ओळख करून दिली. मेडिकल मध्ये उपलब्ध होणारी औषधे, औषधे देण्याची पद्धत,औषधे साठवून ठेवण्याच्या पद्धती, ज्या औषधांची क्षमता संपली आहे. त्यांची विल्हेवाट लावण्याची पद्धत यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे समाधान देखील केले. विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शन मिळावे, हा मुख्य उद्देश लक्षात घेऊन या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी जे. एस. पी. एम शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ. संजय सावंत, डॉ. वसंत बुगडे हे उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल प्र.आडकर उपस्थित होते. हा उपक्रम पार पाडण्यासाठी प्रा. रविराज जाधव, प्रा.अनुराधा पाटील व प्रा.निकिता कोलते यांनी परिश्रम घेतले. तसेच प्रा. स्वप्नील गाडेकर, प्रा. सागर सोनार, प्रा. प्रगती लगदिवे, प्रा. अमृता कस्तुरे, स्वप्नाली सावंत, प्रियांका महाजन, क्षितिजा डोंबाळे, स्वाती माकोने, सुप्रिया पोतदार, विवेक थोरात, पवार काका, कल्पना सुरवसे, कोमल चांदणे यांनी सहकार्य केले.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा