
पुणे (हडपसर) : || राम कृष्ण हरी ||आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. या वारकऱ्यांच्या सेवेसाठी अन्नदान करण्यात आले.
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सरचिटणीस व स्मितसेवा फौंडेशन च्या अध्यक्षा स्मिता तुषार गायकवाड यांच्या वतीने हडपसर गाव येथे स्वागत करण्यात आले.
यावेळी वारकऱ्यांसाठी अन्नदान करण्याचे भाग्य मिळाल्याचा आनंद झाल्याचे स्मिता गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी हजारो वारकरी भक्तांना गुडदाणी, लाडू, चिवडा, बिस्कीट्स वाटप करून सर्वांचे शुभाशीर्वाद घेतले.
या वेळी भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी व स्मितसेवा फौंडेशन चे सदस्य उपस्थित होते. यावेळी संतोष भाटिया, अमोल हजारे, हरिभाऊ काळे, मेनका उमडेकर, अंजली शाह, विमल वागलगावे, निकिता निंगाले, सविता शर्मा, रेखा अबनावे, त्रिशाला वर्मा, संगीता पाटील, सविता वाघमोडे, आशा भूमकर, माधुरी जगताप, प्रभावती भूमकर, लता सोनावणे, विजया भूमकर, वैशाली पाटील, योगिता डोके, सुनीता दळवी, रेणुका पाटील, दिंडोरकर परिवार आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्य संपादक सुनिल थोरात





