घरगुती गौरी सजावट स्पर्धा २०२४ निकाल जाहीर, विश्वकर्मा जयंती दिवशी सन्मानित करणार ; बाळासाहेब शेलार..

पुणे (पिंपरी चिंचवड) : लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या लोहार समाज उत्सव समिती चे वतीने ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या घरगुती गौरी स्पर्धेचा निकाल संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार यांनी नेमलेल्या कमीटीद्वारे निर्णय घेण्यात आल्यानंतर जाहीर करण्यात आला.
या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातुन सहभागी झालेल्या लोहार समाजाच्या महिला भगिनी घरगुती गौरी सजावटीत सहभाग घेतला होता. त्या अनुषंगाने संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब शेलार यांनी उत्सव समितीच्या कमिटी मार्फत स्पर्धेचा निकाल निःपक्षपातीपणे जाहिर केला. यामध्ये प्रथम क्रमांक सौ प्रियंका संदीप पवार, मु.पो.निमगाव केतकी, ता. इंदापूर, जि. पुणे, द्वितीय क्रमांक सौ. अनिता दत्तात्रय हरिहर भोसरी पिंपरी चिंचवड, तृतीय क्रमांक सौ. पायल नितीन कळसाईत एम.आय.डि.सी. बारामती , ता. बारामती, जि.पुणे या विजेत्या ठरल्याचे जाहीर केले.
वरील सर्व विजेत्यांना रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी आकुर्डी (पिंपरी चिंचवड) येथील खंडोबा देवस्थान ट्रस्टचे कार्यालयात होणाऱ्या विश्वकर्मा जयंती महोत्सवात ट्रॉफी आणि बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी विजेत्यांनी आपला सन्मान स्विकारण्यासाठी उपस्थित राहण्याचे संस्थे मार्फत कळविण्यात आले आहे.
लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या लोहार समाज उत्सव समिती चे वतीने संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार यांनी विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन करत “केला आहे पुढे हात! आता हवी तुमची साथ! असे लोहार समाजाला आवाहन केले आहे.




