
पुणे : आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या मागासवर्गीय विविध उद्योगी सहकारी संस्था मर्यादित, पुणे या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा नाना पेठ येथील स्व. ताराबाई तुळशीराम तांबे सांस्कृतिक भवनात उत्साहात पार पडला.
सोहळ्याची सुरुवात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस दलित चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक अनिल कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. समाजातील शिक्षित मागासवर्गीय तरुण-तरुणींना नोकरी, व्यवसाय, उद्योग आणि आर्थिक सबलीकरणाकडे नेण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आल्याचे संस्थेचे पदाधिकारी यांनी सांगितले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ अभ्यासक अनिल कांबळे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षा मंजिरीताई घाडगे, वैशालीताई रेड्डी, समाजकार्यकर्ते राजेश लोंढे, निवृत्त पोलीस निरीक्षक दिगंबर अडागळे, विनोद सोनवणे, सुनील डाडर, विकास अडागळे, मधुकर कांबळे, रमेश मोहिते, विजय शिंदे, किशोर काळोखे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संस्थेमार्फत मागासवर्गीय समाजातील युवक–युवतींना उद्योजकता प्रशिक्षण, वित्तीय मदत, सहकारी उद्योग संधी आणि विविध रोजगार उपक्रम उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काशिनाथ गायकवाड यांनी केले.
या संस्थेच्या उदयामुळे पुण्यात मागासवर्गीय समाजाच्या आर्थिक प्रगतीला नवी चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
Editer sunil thorat



