
पुणे (हवेली) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत मधील कवडी माळवाडी गावातील अंबिका नवरत्न मित्र मंडळ यांच्यावतीने यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मंडळाचे आधारस्तंभ परशुराम हरिभाऊ चव्हाण, अध्यक्ष आबासाहेब साहेबराव चव्हाण व उपाध्यक्ष भाऊसाहेब विठ्ठल घाडगे यांच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाचा शुभारंभ 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश प्राण प्रतिष्ठापनेने झाला. या दिवशी मोठ्या भक्तिभावाने श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दररोज महिला व लहान मुलांसाठी वेगवेगळे मनोरंजक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
विशेषतः सोमवार, दि. 1 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता सत्यनारायण महापूजा होणार असून त्यानंतर संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत महाप्रसाद आयोजित केला आहे. यासाठी गावातील तसेच परिसरातील सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
गणेशोत्सवाचा समारोप मंगळवार, दि. 2 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी भव्य गणेश विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता सुरू होणारी ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत रंगणार असून गावातील तरुणाईसोबत सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
गावकऱ्यांच्या सहभागातून आणि उत्साहातून या वर्षीचा गणेशोत्सव अधिकच वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.
Editer sunil thorat





