महाराष्ट्र
पै. कालीचरन सोलनकर व पै. विश्वचरन सोलनकर या दोन सख्या भावांनी सुवर्णपदक पटकावले..

डॉ. गजानन टिंगरे
अहिल्यानगर : अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ९२ किलो व ९७ किलो वजनगटात पै.कालीचरन सोलनकर व पै.विश्वचरन सोलनकर या दोन सख्या भावांनी सुवर्णपदक पटकावले.
दोघा मल्लाचे वडील,आमचे स्नेही, कुस्ती क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात नाव लौकिक असलेले स्वर्गीय पैलवान मा.झुंजार (वस्ताद) सोलनकर यांच्या अचानक निधनाने खचून न जाता मोठ्या हिमतीने दोघा भावांनी यश संपादन केले.
यावेळी सोलापूर जिल्ह्यातील टाकळीचे, दोघांना पदका बरोबर प्रत्येकी १ बुलेट मिळाली ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे, पै. हनुमंत निंबाळकर, हर्षवर्धन थोरात, स्वप्निल थोरात, पांडुरंग सुळ, अक्षय चव्हाण, अजिंक्य मोहिते, राहूल ननवरे, दिपक रूपनर, संदीप झंजे यांनी दोन्ही पैलवानांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



