अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ‘अंदाजपत्रक २०२५’ या विषयावर व्याख्यान..; हडपसर

पुणे (हडपसर) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ‘अंदाजपत्रक २०२५’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सिनेट सदस्य प्रा. विनायक आंबेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते.
पंतप्रधान धन धान्य कृषी योजना, आयुष्यमान भारत योजना, ई-श्रम पोर्टल, AI मध्ये सरकारकडून कली जाणारी गुंतवणूक या बाबत माहिती दिली. सदर अंदाजपत्रक मध्यमवर्गीय लोकांसाठी दिलासा देणारे अंदाजपत्रक आहे. असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सिनेट सदस्य प्रा. विनायक आंबेकर यांनी केले.
देशाच्या आर्थिक विकासासाठी देशातील लोकांचे उपभोग आणि उत्पन्न वाढविण्यासाठी सदर अंदाजपत्रक महत्त्वाची भूमिका बजावेल असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सदस्य आणि प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले.
याप्रसंगी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक ससाणे, डॉ. नीता कांबळे, डॉ. प्रवीण पोतदार, डॉ. अश्विनी घोगरे, प्रा. समीर नाचण, प्रा. महेश्वरी जाधव, प्रा. आरती पवार उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक ससाणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अश्विनी घोगरे यांनी केले, पाहुण्यांचा परिचय प्रा. आरती पवार तर आभार प्रा. महेश्वरी जाधव यांनी मानले.






