महाराष्ट्रसामाजिक
लोहार समाजाचा भव्य मेळावा होणार कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे समाज बांधव, भगिनींना आवाहन ; संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शेलार.

पिंपरी चिंचवड (आकुर्डी) : लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या लोहार उत्सव समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे ‘विश्वकर्मा जयंती’ महोत्सव व लोहार समाजाचा मेळावा रविवार दि १६ फेब्रुवारी २०२५ रोजी आकुर्डी (पिंपरी चिंचवड) येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत संपन्न होणार आहे.
सालाबादप्रमाणे याही वर्षी रांगोळी स्पर्धा, रक्तदान शिबीर, विश्वकर्मा आराधना, जीवन गौरव पुरस्कार प्रदान, उद्योग रत्न पुरस्कार प्रदान, विश्वकर्मा एंटरटेनमेंट निर्मित ‘कलाकार आपल्यालातला’ हा नृत्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्याचबरोबर खास महिलांसाठी “खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम होणार आहे. पाठीमागील वर्षात झालेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, घरगुती गौरी – गणपती स्पर्धांचे पारितोषिक वितरण ही याच दिवशी होणार आहे.
लोहार समाजाचा भव्य मेळावा होणार असल्याने महाराष्ट्रातील, व पुणे जिल्ह्यातील समाज बांधव, भगिनींना या विश्वकर्मा जयंतीला उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या लोहार उत्सव समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शेलार यांनी केले आहे.



