५० वर्षानंतर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रशांत काळभोर यांची महत्वाची भूमिका…

पुणे (हवेली) : लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांना बिनविरोध करण्यात यश आले असुन त्यांच्या नेतृत्वाखाली ५० वर्षानंतर सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
लोणी काळभोर येथे १९७१ साली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची स्थापन काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केली. या संस्थेच्या माध्यमातून भरीव कर्जवाटप, पिककर्ज आणि रासायनिक खतांची विक्री अशा स्वरुपाचे भरमसाठ कामे चालू असुन या संस्थेची निवडणूक प्रक्रिया २०२४-२०२५ ते २०२८-२०२९ या कालावधीसाठी जाहीर करण्यात आली होती.
लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रियेत १३ जागांसाठी एकूण २६ अर्ज आले होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा पुणे जिल्ह्यात रंगली होती. परंतु २६ पैकी १३ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे सहकार विभागाच्या सहाय्यक सहकारी अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली देसाई यांनी घोषित केले. ही निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षात लोणी काळभोर येथील संस्थेच्या कार्यालयात शुक्रवारी (ता. १४) पार पडली.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांच्या नेतृत्वाखालील सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. प्रशांत काळभोर यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करून मोठा जल्लोष साजरा केला. तर ५० वर्षानंतर निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यासाठी प्रशांत काळभोर यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. पुणे जिल्हात ज्या काही मोजक्या विकास सोसायटया नफ्यात आहेत त्यापैकी लोणी विकास सोसायटी अग्रगण्य आहे.
बिनविरोध निवडून आलेल्या सभासदांची नावे पुढीलप्रमाणे रमेश यशवंत भोसले (सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी), बाळासाहेब जयवंत काळभोर, राहुल दत्तात्रय काळभोर, गुरुदेव दत्तात्रय काळभोर, सागर बाळासो काळभोर, संजय लक्ष्मण काळभोर, बाळासाहेब पर्वतराव काळभोर, सचिन मुरलीधर काळभोर (सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी), राजश्री उदय काळभोर (महिला प्रतिनिधी), वर्षा मयूर काळभोर, (महिला प्रतिनिधी) संजय भिमराव भालेराव (अनुसूचित जाती / जमाती), हेमंत गंगाराम गायकवाड (इतर मागास प्रवर्ग) व अमोल सिदु कोळपे (वि.जा/भ.ज.वि.मा.प्र)




