जिल्हामहाराष्ट्र

महिला पोलीस हवालदार ललीता सिताराम कानवडे यांची उतुंग भरारी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार; उल्लेखनीय कार्याचा आढावा…

 

पुणे (हवेली) : महिला पोलीस ललीता सिताराम कानवडे या लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना आपल्या कर्तव्यात कुठलीही कसुर न करता प्रामाणिकपणे कार्य करत राहिल्या अन या प्रामाणिकपणाचे फळ त्यांना मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कारातून मिळाले.

        महिला पोलीस हवालदार ललीता सिताराम कानवडे यांचे शिक्षण…

पहिली ते चौथी zp शाळेत,नंतर १० वी पर्यंत शिक्षण गावी व संगमनेर कॉलेज येथे ११ वी ते पदवी पर्यंत शिक्षण झाले. कॉलेज जीवनात असताना एनसीसी सी सर्टिफिकेट, nss मधे सहभाग, ११ वी व १२ आर्ट्स ,कॉमर्स व सायन्स चे मुलांना p.t लीडर म्हणून २ वर्ष शिकवल्या, ब्रीज of hope प्रोजेक्ट मधे छोट्या मुलांना टिचींग चे काम केले, कॉलेज मध्ये kalamandal सेक्रेटरी म्हणून सहभाग होता तसेच कमवा व शिका योजनेत काम केले, २००५ मधे योगा मधे नॅशनल साठी सीलेक्शन व २००६ मधे मे नांगरे पाटील यांचे भाषणाने प्रभावित होवून पोलिस दलात भरती झाल्या

       महिला पोलीस हवालदार ललीता सिताराम कानवडे वरिष्ठांनकडुन प्रेरणा…

पोलीस भरती नंतर ट्रेनिंग दरम्यान नागपूर येथे रायफल शूटिंग मधे ८७५ मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळविला, राजकुमार शिंदे dcp झोन ५, हडपसर विभाग यांचे प्रोत्साहन व acp अनुराधा udamle, हडपसर विभाग तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे lonikalbhor पोलीस निरीक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले तसेच पोलिस स्टेशन चे माझे सहकारी यांचे मला प्रेरणा आणि सहकार्य मिळाल्याने मला हे इतके मोठे यश ओढुन आणणे शक्य झाले आहे. ज्यामुळे lonikalbhor पोलिस स्टेशन चे गुन्ह्यातील doshsidhi होण्याचे प्रमाण वाढले.

     महिला पोलीस हवालदार ललीता सिताराम कानवडे, केसेस सोडवताना मन हेलावून टाकणार् या घटना..

लहानपणापासून हाती घेतलेलं काम चिकाटीने करायचं मग ते घरातील, शेतातील किंवा समाजातील, छोटे किंवा मोठे काम कोणतेही असो व जर अशक्य आहे अस इतर म्हणत असतील तर मग ते चॅलेंज म्हणून स्वीकारायचं व सतत डोक्यात प्लॅन ए व प्लॅन b ने घोळवत राहायचं व कुठून रस्ता सापडतो हे शोधायचं ही सवय आहे, सुरुवातीला केस चे फाईल वाचून कधी कधी रडायला पण यायचं, आणि मनात एकच यायचं यात फिर्यादी, पीडित हिला न्याय हवा आहे, सरकारी वकिलांचे मार्गदर्शनाने मग त्या दिशेने प्रयत्न करायला सुरुवात करायची, ते सांगतील त्या प्रमाणे मी माझे १०० टक्के देण्यास सुरुवात केली, आणि हळू हळू कायापालट होवू लागला आणि २०२५ मधे lonikalbhor चे निकालाचे चित्रच बदलले.

महिला पोलीस हवालदार ललीता सिताराम कानवडे यांना वरिष्ठांबद्दल नेहमी आदर..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मान सन्मान मिळाल्यानंतर पोलीस खात्यातील माझे वरिष्ठ आहेत त्यांचा आदर मला सगळ्यात जास्त महत्त्वाचा असुन वेळोवेळी मला पोलीस खात्यातील सर्व सहकार्यानी नेहमीच सहकार्य केले या सन्मानाबद्दल मला यापुढे आणखीन प्रेरणा मिळणार यात शंका नसल्याचे बोलून दाखवले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??