लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेचा भव्य “विश्वकर्मा जयंती” महोत्सव संपन्न.; आकुर्डी. .
रक्तदान शिबीर, खेळ पैठणीचा, जीवन गौरव पुरस्कार अशा विविध कार्यक्रमाने विश्वकर्मा जयंती संपन्न...

पिंपरी चिंचवड (आकुर्डी) : लोहार समाज बहुउद्देशीय संस्था लोहार उत्सव समिती च्या वतीने रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी विश्वकर्मा जयंती महोत्सव व स्नेह मेळावा, महोत्सव आकुर्डी येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता श्री प्रभू विश्वकर्मा आराधना आणि भजनाने झाली. यावेळी भक्ती शक्ती महिला मंडळ पिंपरी चिंचवड आणि गणेश महिला मंडळ संत तुकाराम नगर यांच्या वतीने सादर करण्यात आले. विश्वकर्मा महाआरती चे मानकरी अमित सुभाष पवार, शिवाजीराव पोपळकर, मंदाकिनी हारहारकर आणि दत्तात्रय लोहार यांच्या हस्ते करण्यात आली. उद्घाटन समारंभात मान्यवरांचे स्वागत विश्वकर्मा कळसे यांच्या स्वागत गीताने झाली.
कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी विलास भाऊ मडगिरी माजी स्थायी समिती अध्यक्ष पिंपरी चिंचवड मनपा, युवराज जाधव अध्यक्ष गाडी लोहार उन्नती मंडळ कल्याण, हनुमंत चव्हाण अध्यक्ष सकल लोहार समाज संघटना, प्रकाश लोहार अध्यक्ष भटके विमुक्त ओबीसी मोर्चा, दिलीप वसव कार्यवाह लोहार विकास संस्था, बाळासाहेब शेलार संस्थापक अध्यक्ष, दत्ता लोहार अध्यक्ष उत्सव समिती, औदुंबर कळसाईत उपाध्यक्ष, डॉ. रामदास लाड सचिव, संजीव दाते कार्याध्यक्ष, वसंत साळवणकर, बी. बी. लोहार, रामलिंग कांबळे, शिवाजीराव कळसे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शेलार यांनी केले. यामध्ये त्यांनी संस्थेच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे माहिती दिली. आणि यामधून पिंपरी चिंचवड शहरातील व परिसरातील लोहार समाज कशा पद्धतीने एकत्र येतो याबद्दल माहिती दिली.
प्रमुख पाहुणे युवराज जाधव यांनी समाजाने हेवे द्यावे बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले. समाजात विविध प्रकारच्या संघटना दिसून येतात मात्र त्या सर्वांनी एकत्र येऊन कार्य केले तर विधायक कार्य होऊ शकते असे मत व्यक्त केले.
या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार कैलास भावलाल लोहार राहणार न्याहळोद तालुका जिल्हा धुळे यांना प्रदान करण्यात आला. त्यांनी केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे.
राष्ट्रीय उद्योग दिवसानिमित्त दिला जाणारा उद्योग रत्न पुरस्कार यावेळी दीपक औदुंबर पवार यांनी केलेल्या युवकांसाठीच्या औद्योगिक कार्यासाठी प्रदान करण्यात आला. तसेच पुढील सत्रामध्ये सतीश खरात जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी पुणे यांनी उद्योग व व्यवसाय उभारण्या संदर्भातील शासकीय योजनांची माहिती दिली.
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे विजेते प्रथम क्रमांक विजेते श्री वसंतराव साळवणकर( नागपूर )यांना बक्षीस वितरण करताना मा. स्थायी समिती अध्यक्ष श्रीविलास मडिगेरी श्री बाळासाहेब शेलार.
लोहार समाज बहुउद्देशीय संस्था भोसरी पिंपरी चिंचवड आणि लोहार समाज उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रभू श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव व स्नेह मेळाव्यानिमित्त धुळे जिल्ह्यातील श्री कैलास भावलाल लोहार यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लोहार समाज बहुउद्देशीय संस्था आणि उद्योग समिती पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी समाजातील उद्योगांनी व्यवसाय करणाऱ्या उत्कृष्ट व्यक्तीला लोहार समाज उद्योग रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येतो तो यावर्षी पंढरपूर येथील युवा उद्योजक श्री दीपक औदुंबर पवार यांना प्रदान करण्यात आला.
द्वितीय यशवंत व्यापारी, तृतीय माधुरी थोरात यांना बक्षीस वितरण करण्यात आले. घरगुती गौरी सजावट स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्रियंका पवार, द्वितीय अनिता हरिहर आणि तृतीय पायल कळसाईत यांना बक्षीस प्रदान करण्यात आले. घरगुती गणपती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक कोमल चाफिककानडे, द्वितीय रामेश्वर हिवाळे, तृतीय गणेश हरिहर यांना बक्षीस प्राप्त झाले्
उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव प्रा. रामदास लाड यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन दत्ता लोहार, औदुंबर कळसाईत, संजीव दाते, डॉ. रामदास लाड, रमेश माने, महेश हरिहर, विजयकुमार सूर्यवंशी, संतोष मुळे, प्रशांत पोपसभट यांनी केले. तर कैलास कांबळे, शिवाजी कळशे, अमोल पवार, भारतीताई शेलार, राजश्री हरिहर, मदन हारहारकर यांचे सहकार्य लाभले.






