क्राईम न्युजमहाराष्ट्र

बी. जे. मेडिकल कॉलेजच्या दोन लाचखोर अधिकाऱ्यांना एसीबीकडून बेड्या…ससून परिसरातील घटना…

पुणे : बीजे मेडिकल कॉलेज मधील दोन लाचखोर अधिकाऱ्यांना एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई ससून रुग्णालय परिसरात असलेल्या बी. जे. मेडिकल कॉलेज मधील कार्यालयात बुधवारी संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली.

यामध्ये वरिष्ठ सहाय्यक आणि कार्यालयीन अधीक्षकाचा समावेश असल्याचे एसीबीचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले.

वरिष्ठ सहाय्यक जयंत पर्वत चौधरी (४९) आणि कार्यालयीन अधीक्षक सुरेश विश्वनाथ बोनवळे (५३) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एसीबी कडे ३२ वर्षीय व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा फर्निचरचा व्यवसाय आहे. त्यांनी बी. जे. मेडिकल कॉलेजला फर्निचरचा पुरवठा केलेला होता. त्याचे २० लाख रुपये बिल झालेले होते.

यातील दहा लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी १३ टक्के प्रमाणे एक लाख ३० हजार रुपयांची लाच त्यांच्याकडे मागण्यात आली. तडजोडीअंती एक लाख रुपये लाच स्वीकारण्यास आरोपी तयार झाले. दरम्यान, तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्यामुळे त्यांनी एसीबीकडे या संदर्भात तक्रार दाखल केली. या तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यानंतर ससून परिसरात बी.जे. मेडिकल कॉलेजमधील कार्यालयात सापळा रचण्यात आला. एक लाख रुपयांची लाच घेताना चौधरी आणि बोनवळे या दोघांना रंगेहात पकडण्यात आले. या दोघांच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??