
हडपसर (ता. हवेली) : दि. २२ नोव्हेंबर
सुरेखा रमेश हरगुडे यांच्या संकल्पनेतून आणि रमेश (बापू) हरगुडे मित्र परिवाराच्या नियोजनातून आयोजित काशी–अयोध्या दुसऱ्या देवदर्शन यात्रेला केसनंद–कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील भाविकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. “हर हर महादेव” आणि “जय श्रीराम”च्या गगनभेदी जयघोषात हडपसर रेल्वे स्थानक भक्तिरसात न्हाऊन निघाले. दुपारी १२.३० वाजता माजी सरपंच मिलिंद हरगुडे, संतोष हरगुडे आदी मान्यवरांच्या हस्ते यात्रेला हिरवा झेंडा दाखवत भव्य प्रस्थान करण्यात आले.
मान्यवरांची भव्य उपस्थिती…
या वेळी माजी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सारिका मिलिंद हरगुडे, माजी सरपंच तानाजी हरगुडे, माजी सरपंच प्रमोद हरगुडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य वाल्मीक हरगुडे, उद्योजक शिवाजी हरगुडे आदींची विशेष उपस्थिती होती.
सामाजिक बांधिलकी आणि विकासाचा ध्यास…
केसनंद–कोरेगाव मूळ गटात वारकरी विचारांचा अधिष्ठान, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती आणि गोरगरिबांची निस्वार्थ सेवा हे रमेश हरगुडे व ग्रा.पं. सदस्या सुरेखा रमेश हरगुडे यांचे कार्य वैशिष्ट्य ठरले आहे. शेतकरी कुटुंबातील, समाजातील मूलभूत प्रश्न जाणणारे आणि विकासाला प्राधान्य देणारे हे नेतृत्व आज सामान्यांच्या मनात ठामपणे रुजले आहे.
भक्तीसेवेचा अद्वितीय आदर्श — सुरेखा हरगुडे…
कुबेर महिला पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा म्हणून तसेच ग्रामसेविका म्हणून सुरेखा रमेश हरगुडे यांनी हजारो भाविकांना काशी विश्वेश्वर व अयोध्या श्रीरामाच्या दर्शनासाठी एकत्र आणत भक्तीसेवेचा आदर्श निर्माण केला. यात्रेच्या दुसऱ्या रेल्वेला भाविकांनी जबरदस्त प्रतिसाद दिल्याने हडपसर स्टेशन भक्तिरसात दुमदुमले.
“सेवाभावी वृत्तीमुळेच आशीर्वाद”— भाविकांची प्रतिक्रिया…
भाविकांनी व्यक्त केले की, “सुरेखा ताई आणि संतोष बापू यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे आणि विकासदृष्टीमुळे त्यांना मायबाप जनतेचा भरभरून आशीर्वाद मिळत आहे. त्यांच्या राजकीय स्वप्नांची पूर्तता होईल, यावर त्यांचा विश्वास आहे.”
उत्तम नियोजनामुळे प्रवास सुखद…
रमेश (बापू) हरगुडे मित्र परिवार आणि केसनंद ग्राम विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून यात्रेचे परिपूर्ण नियोजन करण्यात आले होते.
भाविकांसाठी चहा–नाष्टा, दूध, बिस्किटे, शुद्ध पिण्याचे पाणी, डॉक्टर व मदतनिसांचे पथक, शेकडो स्वयंसेवक, सुरक्षा व्यवस्था यामुळे प्रवास, मुक्काम आणि दर्शन सुरळीतपणे पार पडले.
गावागावातून उत्साह, स्टेशनवर जयघोषांचा जल्लोष…
हजारो यात्रेकरू, गावांचे सरपंच–उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “हर हर महादेव”, “जय श्रीराम” च्या घोषात हडपसर स्टेशनचा परिसर पलभरासाठी तीर्थक्षेत्र भासू लागला.
आजीबाईंच्या जात्यावरील ओव्या— भावनांना स्पर्श…
एका वयोवृद्ध आजीबाईंनी पारंपरिक ओव्यातून हरगुडे कुटुंबासाठी मंगलकामना व्यक्त केल्या “पहिली माझी ओवी ग पंढरीच्या विठ्ठला,
सुखी ठेव माझ्या रमेश बापूला…” “तिसरी माझी ओवी ग जेजुरीच्या खंडोबाला, गुलाल उधळू दे सुरेखाताई, संतोष बापूला…”क्षया ओव्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांत भावनिक पाणी तरळले.
“विकासाची गंगा गटात आणणार”— सुरेखा हरगुडे व संतोष हरगुडे…
दरम्यान सुरेखा हरगुडे व संतोष पांडुरंग हरगुडे यांनी सांगितले “मायबाप जनतेच्या आशीर्वादानेच ही भव्य यात्रा शक्य झाली. भगवंताच्या कृपेने केसनंद–कोरेगाव मूळ गटात विकासाची गंगा आणणे हे आमचे ध्येय आहे. ही यात्रा भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारी ठरली.”
Editer sunil thorat






