
डॉ गजानन टिंगरे
पुणे : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत महाराष्ट्रातील २० लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र आणि १० लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण आज अमित शाह यांच्या हस्ते पुणे येथे झाले.
मुख्य मंञी महाराष्ट्र राज्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंञी एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंञी अजित पवार, चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थित व ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती मध्ये राबविण्यात आला.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक दोन अंतर्गत लासुर्णे गावातील व वाडीवस्तीवरील एकूण ६४ लाभार्थी यांना मंजुरी आदेशाच्या वाटपाचा तसेच घरकुल बांधकाम मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळा लासुर्णे या ठिकाणी आयोजित केलेला होता.
कार्यक्रमांमध्ये अमोल पाटील व्हाईस चेअरमन छत्रपती सहकारी कारखाना भवानी नगर व गजानन वाकसे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा पुणे यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीच्या आदेशाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास स्वप्निल गायकवाड ग्रामपंचायत अधिकारी लासुर्णे गणेश धायगुडे मुख्याध्यापक जि प शाळा सुरेश लोंढे, मोहन कोकरे, अक्षय चव्हाण, शंकर लोंढे, दिपक रूपनर, संदीप वाघमोडे, अनिता भोसले, किसन गायकवाड, मच्छिंद्र वाडकर उपस्थित होते. यावेळी मान्यवर व लाभार्थी यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. हाकार्यक्रम लाईव्ह प्रोजेक्टर वर दाखवण्यात आला.






