पुणे (भोर) : महावितरण कंपनीच्या भोर ग्रामीण कार्यालयात यशवंत मारुती धोंडे (रा. चिखलगाव ता भोर) यांनी घरगुती मीटरसाठी मागील वर्षी जानेवारी महिन्यात अर्ज केला होता.
मात्र, थकबाकी असल्याचे कारण देत वर्षभर मीटर दिले नाही. संबंधित अधिकाऱ्याची बदली झाली, दुसऱ्या अधिकारयाला भेटल्यावर कागदपत्र सापडत नव्हती. शेवटी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांनी कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यावर कागदपत्राची शोधाशोध केली. अखेर कागदपत्र सापडल आणि चलन भरून दोन दिवसात शेतकऱ्याला मीटर देण्याचे मान्य करण्यात आले. यामुळे वर्षभराने बाठे यांच्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळाला आहे.
याबाबतची महिती अशी, मंदार राघू धोंडे यांची वीज बिल थकबाकी आहे. मात्र, मंदार धोंडे व यशवंत मारुती धोंडे यांच्या वडिलांचे नाव एकच असून खात्री न करता महावितरणचे शाखा अभियंता संदीप गादे यांनी थकबाकी असल्याचे कारण देत मिटर दिलेला नाही. मात्र, प्रत्यक्षात खात्री न करताच दुसऱ्या शेतकऱ्याची थकबाकी असताना केवळ वडिलांच्या नावात साम्य असल्यामुळे वर्षभर हेलपाटे मारूनही मीटर दिलेले नाही. याचा नाहक मानसिक त्रास संबंधित शेतकऱ्याला सहन करावा लागला.
शेवटी शेतकऱ्याने माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांना झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर आज बाठे यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात संबंधित अधिकारी यांना धारेवर धरले. त्यानंतर कागदपत्रांची शोधाशोध झाली. कागदपत्रे सापडली, आणि चलन भरून सोमवारी मीटर देण्याचे मान्य केले. यामुळे संबंधित शेतकरी यशवंत धोंडे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पी. एन. गायकवाड, शाखा अभियंता, महावितरण.
वीज वितरण कंपनीची थकबाकी आहे, का नाही याची खात्री केली. मात्र, यशवंत धोडे यांची कोणतीही थकबाकी नाही. त्यामुळे त्यांना मीटर देण्यास कोणतीच अडचण नसून दोन दिवसात मीटर बसवला जाईल.
चंद्रकांत बाठे, माजी जिल्हा परिषद सदस्य.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना घरगुती मीटर महत्त्वाचा असून संबंधित अधिकारी यांनी शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावू नये. शेतकऱ्यांना मदत करावी.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा