
पुणे (इंदापूर) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त विशेष लेख प्रकाशित करण्यात आला असून, त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाची महत्त्वपूर्ण झलक त्यात अधोरेखित करण्यात आली आहे.
“शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा अंगीकारत सामाजिक बांधिलकी जोपासणारे, आणि लोकहितासाठी निर्णय घेणारे नेतृत्व म्हणजेच अजितदादा पवार,” अशा शब्दांत प्रा. शहाजी खंडागळे (रयत शिक्षण संस्था) यांनी आपल्या शब्दांकनातून गौरव केला.
दादांच्या कार्यपद्धतीमुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. त्यांनी शहरी आणि ग्रामीण भागात विकासाचे जाळे उभे करताना जनतेच्या गरजा ओळखून निर्णय घेतले. त्यांच्या कार्यामुळे समाजातील तरुणांना प्रेरणा मिळत असून हजारो कार्यकर्ते त्यांच्यापासून प्रेरित होऊन सामाजिक कामात सक्रिय आहेत.
अर्थमंत्री म्हणून उत्तम नियोजन आणि अंमलबजावणी करणारे, राज्यातील कोणत्याही अडचणीच्या वेळी योग्य निर्णय घेऊन परिस्थिती सांभाळणारे नेते म्हणून अजितदादांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. “बोले तैसे चाले, त्यांची वंदावी पाऊले” ही उक्ती त्यांच्यावर सार्थ ठरते.
दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रा. खंडागळे म्हणाले, “आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची घौडदौड अशीच सुरू राहो आणि आपणास दीर्घायुष्य लाभो, हीच पंढरपूरच्या विठ्ठल चरणी प्रार्थना!”
संपादक डॉ गजानन टिंगरे






