
पुणे (हवेली) : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, एन्शंट ट्रेल्स, हरिभाई देसाई महाविद्यालय इतिहास विभाग आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय भूगोल व पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने थेऊर येथे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून हरिभाई देसाई महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. गणेश राऊत, भारतविद्येचे अभ्यासक श्री गिरीनाथ भारदे, श्री. केशव विद्वांस, मोरया गोसावी ट्रस्ट चिंचवड, अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या भूगोल व पर्यटन विभाग प्रमुख डॉ. सविता कुलकर्णी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरवातीला श्री विनय वाघमारे यांनी उपस्थितांचे भेटवस्तू देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गिरीनाथ भारदे यांनी केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. गणेश राऊत यांनी या परिसराचा भौगोलिक दृष्टीने आढावा घेतला व पेशवे पदाची वस्त्रे हाती घेतल्यापासून बाळाजी बाजीराव ते माधवराव पेशवे इथपर्यंतचा इतिहास त्यांनी सांगितला. वयाच्या सोळाव्या वर्षी पेशवाईची वस्त्रे हातात आल्यानंतर चारी बाजूंनी शत्रू दिसत असताना अत्यंत कुशलतेने त्यांनी राज्यकारभार केला आणि मराठी साम्राज्य वाचवले. या बरोबरच या काळातील माणसे, त्यांचा करारीपणा, निष्ठा यांचाही उल्लेख केला. हा इतिहास सर्वांना माहीत व्हावा या उद्देशाने हा उपक्रम आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.
माधवराव पेशवे यांनी पेशवाईची वस्त्रे घेतल्याला २६४ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याला, स्मृतींना उजाळा देण्यात आला. यानंतर मोरया गोसावी ट्रस्टचे श्री विध्वंस यांनी मनोगत व्यक्त करताना असे उपक्रम आयोजित केल्यास लोकांपर्यंत इतिहास पोचतो असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. सविता कुलकर्णी यांनी अशा कार्यक्रमांचे उपयोग अनेक असून त्यातून इतिहास, भूगोल विद्यार्थ्यांना कळतो. या इतिहासाचा उपयोग भविष्यामध्ये करून घेण्यासाठी योग्य पद्धतीने या सर्व गोष्टी समोर आल्यास त्याचा निश्चितपणे उपयोग होत असल्याचे मत त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनीषा जिनगर या विद्यार्थिनीने केले.
या उपक्रमाचे नियोजन सविता कुलकर्णी डॉ. गणेश गांधिले, प्रा. शितल गायकवाड, प्रा. रेवती नेवासकर, प्रा. ज्योती धोत्रे, प्रा. अविनाश राठोड यांनी हरिभाई देसाई महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. गणेश राऊत यांच्या सहकार्याने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. यानंतर विद्यार्थ्यांना मंदिर परिसर, सतीचे वृंदावन हा परिसर दाखवून त्याचा इतिहास सांगण्यात आला.
Editer sunil thorat







