
पुणे : Quick Heal Foundation अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या “Cyber Shiksha for Cyber Suraksha” या उपक्रमाच्या माध्यमातून आण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या Cyber Warriors टीमने कृष्णाजी खंडुजी घुले, मांजरी बु. येथे भेट देत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता वाढवणे, सुरक्षित इंटरनेट वापराचे महत्त्व पटवून देणे आणि सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सजगता निर्माण करणे हा होता.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स शाखेचे विद्यार्थी Cyber Warriors म्हणून सहभागी झाले होते. तेजस दळवी, मृणाल दाणेज, आश्लेषा दामगुडे, प्रणाली शिंदे,यश भराटे, प्रणव तळेकर, समीक्षा गायकवाड, अंकिता हरपळे, नेहा विश्वासे, अपूर्वा वाळके व अहन दगडे हे स्वयंसेवक Quick Heal Foundationच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित असून त्यांनी पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे विविध पैलू अत्यंत प्रभावी पद्धतीने समजावून सांगितले. सोशल मीडिया वापरातील धोके, गोपनीयता राखण्याचे उपाय, फिशिंग, OTP फसवणूक, बनावट लिंक, पासवर्ड सुरक्षेचे महत्त्व यावर संवादात्मक सत्राद्वारे माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी ही यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला, त्यांचे सायबर गुन्ह्यांवर विविध अनुभव सांगितले, सायबर सुरक्षेच्या संबंधित विविध प्रश्न विचारले आणि सायबर सुरक्षेची शपथ घेतली.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांद्वारे विद्यार्थ्यांसाठी सादर केलेले सायबर शिक्षण…
यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सादरीकरण कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीची भावना विकसित झाली. तसेच, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाऔमध्ये महाविद्यालयातील अनेक मान्यवरांचा मोलाचा सहभाग होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, डॉ. विलास वाणी, प्रा. अनिल जगताप आणि प्रा. मनिषा गाडेकर यांनी Cyber Warriors टीमला मार्गदर्शन करत सायबर सुरक्षेच्या गरजेवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर जागरूकता वाढत असून, ते आता अधिक सुरक्षित आणि जबाबदार नागरिक बनत आहेत.” त्यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करत असे उपक्रम नियमितपणे राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
मुख्याध्यापक निगडे आर. डी, उपमुख्याध्यापक शेलार बी. के, पर्यवेक्षक सोनवणे एन. एन, उपशिक्षक ताकवले एस. आर आणि उपशिक्षक मेमाणे डी. व्ही या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे अभिनंदन केले. व अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होत असल्याचे सांगितले.
ह्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे Cyber Warriors टीमने अत्यंत प्रभावी सादरीकरण केले आणि शाळेतील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. ह्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे Cyber Warriors टीमने अत्यंत प्रभावी सादरीकरण केले आणि शाळेतील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली.
Quick Heal Foundationच्या CSR उपक्रमांतर्गत अशा कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये करण्यात येत असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल जबाबदारीची भावना निर्माण होत आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना डिजिटल युगात सुरक्षिततेचे भान देणारा ठरला असून, शाळा स्तरावर सायबर शिक्षणाची पायाभरणी होत आहे.
Editer sunil thorat







