
पुणे (हडपसर) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथे राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते.
अक्षय ब्लड बॅंक हडपसर यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. शंतनू जगदाळे, आयर्न मॅन माजी नगरसेवक सुनील बनकर, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रंजना पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप, रा.से.यो. जिल्हा समन्वयक डॉ. सविता कुलकर्णी, कार्यक्रम अधिकारी प्रा. ऋषिकेश मोरे, प्रा. नरसिंग पावडे एन.सी.सी ऑफिसर लेफ्टनंट डॉ. धिरज देशमुख, अक्षय ब्लड बँकेचे श्री योगेश बुरांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. शंतनू जगदाळे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. डॉ. रंजना पाटील यांनी विद्याथ्र्यांनी रक्तदान शिबीराला दिलेला प्रतिसाद पाहून त्यांचे कौतुक केले. यावेळी ४८ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक यांचा समावेश होता. यानंतर रक्तदान केलेल्या विद्याथ्र्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. अनिल जगताप, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. धिरज देशमुख यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सविता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
Editer Sunil thorat






