प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांचा करिअर कट्टाच्या राज्यस्तरीय उत्कृष्ट प्राचार्य प्रवर्तक पुरस्काराने गौरव…

पुणे (हडपसर) : जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांचा महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय उत्कृष्ट प्राचार्य प्रवर्तक पुरस्काराने गौरव करण्यात आला.
हा पुरस्कार पॉवर सेक्टर स्किल कौन्सिल सेक्रेटरी प्रफुल्ल यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र अध्यक्ष यशवंत शितोळे, डॉ. सोनाली लोहार, रुपाली दळवी, शंकर जाधव, प्रशांत शितोळे उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे व एकदिवसीय कार्यशाळेचे मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या सेंटर ऑफ एक्सेलन्स सेंटरला करिअर कट्टाच्या मार्फत एक लक्ष रुपयांचे अनुदान प्रदान करण्यात आले. या अनुदानाच्या धनादेशाचा स्वीकार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे,उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, डॉ. नीता कांबळे, प्रा. ऋषिकेश मोरे यांनी केला.
महाविद्यालयात प्रभावीपणे करिअर कट्टाचे उपक्रम राबविल्या बद्दल प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, प्रा. अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, डॉ. नीता कांबळे यांनी करिअर कट्टाचे उपक्रम प्रभावीपणे राबविले.
या पुरस्काराबद्दल बद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव संदीप कदम, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार व ए. एम.जाधव यांनी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांचे अभिनंदन केले.




