राजकीयसामाजिक

९ वर्षांपासून रखडलेले शहीद सौरभ फराटे यांच्या स्मरणार्थ शहीद स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे ; प्रशांत सुरसे काॅग्रेस…

देशप्रेमी आणि देशभक्त एकत्र येऊन या शहीद स्मारक उभारणीसाठी तीव्र आंदोलन सुरू करणार या सर्वस्वी पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील ; काँग्रेसचे प्रशांत सुरसे..

पुणे (हडपसर) : हडपसर येथील भारतीय लष्करातील वीर जवान, शहीद सौरभ फराटे यांना १७ डिसेंबर २०१६ रोजी जम्मू काश्मीरच्या पोम्पार येथे दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले. त्याच्या वीरतेची आणि बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी शहीद सौरभ फराटे यांचे स्मारक उभारण्याची घोषणा हो ९ वर्षे झाले तरी स्मारक होत नाही.

अतिशय निंदनीय परिस्थिती आहे. तरी या स्मारकाचे काम तातडीने सुरू करावे. यासाठी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे प्रशांत सुरसे व शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली.

हडपसरचे सुपुत्र आणि भारतीय लष्करातील वीर जवान स्व.सौरभ फराटे यांना दिनांक १७ डिसेंबर २०१६ रोजी जम्मू काश्मीर येथील पोम्पार येथे दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले. त्यांचे अंत्यविधी सर्व प्रतिष्ठित नेत्यांच्या उपस्थितीत पार पडले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री स्व. गिरीश बापट, माजी खासदार शरदचंद्रजी पवार आणि अनेक नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. याच वेळेस शहीद सौरभ फराटे यांच्या स्मारकाची उभारणी करण्याची घोषणा केली गेली.

दिनांक १८ ऑगस्ट २०१७ रोजी प्रशांत सुरसे आणि सहकाऱ्यांनी तत्कालीन महापौर स्व. मुक्ताताई टिळक यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि शहीद सौरभ फराटे यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्याची मागणी केली. यावेळी शहीद सौरभ फराटे यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार आणि त्यांच्या परवानगीने हे स्मारक हडपसर परिसरात उभारण्यासाठी मा. महापौरांनी आश्वासन दिले.

१४ सप्टेंबर २०१७ रोजी, शहीद सौरभ फराटे यांच्या वीरमाता श्रीमती मंगल फराटे आणि वीर पिता नंदकुमार फराटे यांनी पु महापौर स्व. मुक्ताताई टिळक यांची भेट घेतली. त्यानंतर ९ ऑक्टोबर २०१७ रोजी स्व. मुक्ताताई टिळक यांनी पुणे महानगरपालिकेतील शहीद सौरभ फराटे यांच्या कुटुंबासमवेत जागेची पाहणी केली. त्या वेळेस कुटुंबीयांनी महापौरांच्या सूचनेनुसार, सौरभ फराटे यांच्या स्मारक उभारणीसाठी हडपसर येथील कै. रामचंद्र बनकर शैक्षणिक क्रीडा संकुलाच्या प्रांगणात करावे, कारण त्यांचे बालपण व सैन्य भरतीचे प्रशिक्षण हे सातवडी हडपसर येथे झालेले आहे तसेच शाळेतील मुलांना युवकांना हे स्मारक प्रेरणादायी ठरेल. असे लेखी पत्र दिले.यानंतर महापौरांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीचे अध्यक्ष सर्व  पक्षाचे गट नेते व प्रभागातील नगरसेवक, वीर माता वीर पिता व प्रशांत सुरसे अशा सर्वांच्या उपस्थित बैठकी घेण्यात आली.

परंतु काही समाजकंटकांनी या स्मारकाच्या उभारणीला विरोध केला आणि यामुळे स्मारक उभारण्यास अडचण निर्माण झाली. यानंतर प्रशांत सुरसे आणि सहकाऱ्यांनी अनेक आंदोलन व पाठपुरावा केल्याने पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत, १९ जुलै २०१८ रोजी, सभा क्र ३२. ठराव क्रमांक २०० नुसार हडपसर येथील सर्वे नंबर १६, हेमंत करकरे उद्यानात शहीद सौरभ फराटे यांचे स्मारक उभारण्यास मान्यता देण्यात आली.

अद्याप ९ वर्षे झाली तरी शहीद सौरभ फराटे यांच्या स्मारकाची उभारणी होऊ शकलेली नाही, हे पुणेकरांसाठी अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. जो सैनिक देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देतो, त्याला जात आणि धर्माचे भेदभाव नसतात. तो आपला परिवार सोडून देशाच्या संरक्षणासाठी लढतो. अशा वीर जवानांना श्रद्धांजली देणारे स्मारक उभारणे हे आपले कर्तव्य आहे. खर तर शहीद जवानांच्या कुटुंबाच्या पाठीशी संपूर्ण देशाने उभे राहणे आवश्यक आहे. देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देतात.आपण मात्र अशा शहीद जवानांच्या पुढील पिढीला प्रेरणा देणाऱ्या शहीद स्मारकाला विरोध करतो खरंतर विरोध करणे अक्षम्य पाप आहे आणि अशा राजकीय लोकांना पाठीशी घालणे हे महापाप आहे. अशी भावना यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रशांत सुरसे यांनी व्यक्त केले.

शहीद जवानांचे बलिदान हे अनमोल आहे त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे तरी आपणास विनंती करतो की, दि. १९/०७/२०१८ पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा क्रमांक- ३२, विषय क्र.७३९ ठराव क्र., २०० नुसार, आपण. १० दिवसांच्या आत सर्वे नं १६ मधील पुणे मनपा च्या स्व. हेमंत करकरे उद्यानातील जागेची पाहणी करावी तसेच दरवर्षी या स्मारकासाठी अर्थसंकल्प मध्ये २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात येते ती तरतूद येणाऱ्या अर्थसंकल्पात १ कोटी रुपये करावी व उद्यानात येणाऱ्या नागरिकांना कुठली अडचण न होता शहीद सौरभ फराटे यांच्या स्मरणार्थ शहीद स्मारकाच्या उभारणीसाठी पुढाकार घ्यावा. अन्यथा, देशप्रेमी आणि देशभक्त एकत्र येऊन या शहीद स्मारक उभारणीसाठी तीव्र आंदोलन सुरू करणार या सर्वस्वी पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील. काँग्रेसचे प्रशांत सुरसे यांनी यावेळी केली. शिष्टमंडळामध्ये महिला काँग्रेस शहर उपाध्यक्ष पल्लवी सुरसे सामाजिक कार्यकर्त नंदकुमार अजोतिकार, गणेश जगताप ,सचिन नेमकर , विरनाथ सरडे, वृषभ रणदिवे, कार्यकर्ते उपस्थित होते

प्रशांत सुरसे, काँग्रेस

देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या शहीद जवानांच्या शहीद स्मारकाला विरोध करणाऱ्या स्वतःला जनतेचे मालक समजणाऱ्या स्वार्थी प्रवृत्तीचा योग्य वेळी पुराव्या सहित जनतेसमोर बुरखा फाडणार, अशा प्रवृत्तीला जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??