अवैध्य धंदयांचे समुळ उच्चाटण करण्याचे उद्दीष्ठ असल्याची भावना ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे..
चारचाकी गाडी सह ३५० लिटर दारु असा एकूण २ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त...

पुणे (हवेली) : गावठी हातभट्टीची तयार दारुची अवैध वाहतुक करणाऱ्यास लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचेकडून चारचाकी गाडी सह ३५० लिटर दारु असा एकूण २ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांचे आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे लोणीकाळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध्य धंदयावर धडक कारवाई मोहिम सुरु केली आहे.
या मोहिमे दरम्यान रविवार (२३ फेब्रुवारी) रोजी सकाळी बातमीदारामार्फत सकाळी ११.३० वा.चे सुमारास बातमी मिळाली की थेऊर (ता. हवेली) गावचे हद्दीत नायगाव ते थेऊर शिवरोड येथुन एक इसम त्याचे चारचाकी गाडीतुन गावठी हातभट्टीची तयार दारुचे कॅन्डची वाहतुक करुन जात असल्याची बातमी मिळाली होती.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलीस हवालदार विजय जाधव, प्रशांत सुतार व सागर कदम यांनी सदर ठिकाणी सापळा रचला. काही वेळाने अवैध गावठी हातभट्टीची तयार दारु वाहतूक करत असलेली मारुती कंपनीची एस एक्स ४ क्रमांक एमएच १२ एफएफ ७४५७ ही चारचाकी कार पकडली. त्या गाडीमध्ये पोलीसांना गावठी हातभट्टीचे तयार दारुने भरलेले एकुण १० कॅन्ड एकुन ३५० लिटर दारु मिळुन आल्याने ती पोलीसांनी जप्त केली आहे.
सदर कारवाई दरम्यान अवैध गावठी हातभट्टीचे तयार दारुचे कॅन्ड वाहुन नेणारा संदिप प्रताप जाधव, (वय २५ वर्षे, रा. मारुती मंदिराजवळ, कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) यास ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायदा कलमान्वये कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई दरम्यान आरोपीकडुन एकुण २ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध धंदयावरील या कारवायांमुळे लोणी काळभोर परिसरातील सर्व अवैध धंदे चालकांचे तसेच अवैध धंदे व अनाधिकृत कृत्यांना चांगलाच चाप बसविण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या अत्यंत प्रभावी व दर्जेदार कारवाया करुन अवैध्य धंदयांचे समुळ उच्चाटण करण्याचे उद्दीष्ठ असल्याची भावना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विजय जाधव हे करीत आहे



