जिल्हासामाजिक

मांजराईनगर झोपडपट्टीमध्ये पिण्याचे व वापरण्याचे पाणी बंद, ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे पाण्यासाठी हाल ; राजेंद्र साळवे मांजरी बुद्रुक…

पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करणार.. राजेंद्र साळवे मांजरी बुद्रुक..

पुणे (हवेली) : मांजरी बुद्रुक मधील मांजराईनगर परिसरातील माळवाडी, कुंजीर वस्ती, वेताळ वस्ती, राजीव गांधी नगर, सटवाई नगर, ११६ घरकुल, ७२ घरकुल, आधी झोपडपट्टी भागासह गावठाण मध्ये ग्रामपंचायत काळातील बोरवेलचे मुबलक वापरण्यासाठी पाणी मिळायचे.. आता तशी परिस्थिती राहिली नाही.

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र साळवे यांनी ‘द पाॅईट न्युजशी बोलतांना सांगितले. की मांजरी बुद्रुक गाव पुणे मनपात समाविष्ट झाल्यानंतर येथील नागरिकांनी, या परिसरात ५० दिवस बेमुदत धरणे आंदोलन करून पिण्याचे टँकरद्वारे पाणी चालू केले होते. त्यामुळे नागरिकांना दररोज टँकर येत असल्यामुळे दोन वर्ष दिलासा मिळाला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची या भागामध्ये पाच दशलक्ष क्षमतेची टाकी बांधलेली आहे. त्यावेळी लोकसंख्या मर्यादित होती. आता या जीवन प्राधिकरणाने टाकलेल्या पिण्याच्या पाण्यासाठी मुख्य जलवाहिन्यांना भोके पाडून घरोघरी न कनेक्शन दिले आहे. रस्त्यावरच अर्धवट खोदाई करून रस्ते खराब केले आहे. व नळ कनेक्शन घेताना प्लॅस्टिकची पाईपलाईन उघड्यावर ठेवल्यामुळे ती तुटण्याचा व त्यामुळे भांडणे व मारामारी होण्याचा धोका निर्माण झाले आहे. त्यामुळे वापरण्याचे पाणी या परिसरात बंद झालेले आहे.

                    बेकादेशीर पाईपलाईन द्वारे पाणी पुरवले जाते..

राजेंद्र साळवे म्हणाले जीवन प्राधिकरणाचे बेकायदेशीर नळाद्वारे मिळणारे प्राणी सुद्धा चार ते पाच दिवसांनी येत आहे.. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी खूपच हाल होत आहेत. याचे मुख्य कारण नवीन वाढलेल्या केशवनगर हद्दीपर्यंत दहा ते पंधरा हजार वसाहतींना सदरचे पाणी बेकादेशीर पाईपलाईन द्वारे पुरवले आहे. मांजरी बुद्रुक हे नदीच्या काठी गाव असताना पाणी मिळत नाही याची खुप मोठी खंत आहे. नक्की प्रशासनाला पाणी द्यायचे आहे का नाही..

                जनता तहानलेली, पुढारी मनपाच्या पाणी योजनेचे मालक म्हणे..

खरंतर वार्ड क्रमांक ३ मध्ये सैनिक नगर साठ फुटी रोड येथे या भागातील लोकांसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची टाकी पुणे मनपा ने त्वरित बांधणे आवश्यक आहे. परंतु पुढाऱ्यांनी पुणे मनपाच्या पाणी योजनेचे मालक म्हणून फ्लेक्सबाजी करून मांजराईनगर परिसरातील झोपडपट्टी भागांमध्ये पाण्याची नियोजन विस्कळीत करून टाकले आहे. व पुणे महापालिका सदरची वस्तुस्थिती माहीत असताना त्याकडे दुर्लक्ष करत आहे.. त्यामुळे या भागातील गरीब नागरिक पाण्यासाठी दुहेरी कात्रीत सापडले आहे. प्रशासनाला जाग कधी येणार?

                 राजेंद्र साळवे. सामाजिक कार्यकर्ते.

झोपडपट्टी भागातील शासनाने बांधलेल्या ७२ घरकुल व ११६ घरकुल झोपडपट्टीमध्ये पुणे मनपा ने चार इंच बिडाची पाईपाची अंतर्गत लाईन त्वरित टाकावी व घरगुती नळ कनेक्शन देणे.. तोपर्यंत बंद केलेले वापरण्याचे पाणी त्वरित चालू करावे.. व दररोज टँकरने या भागात पाणीपुरवठा करावा.. या मुख्य मागणीसाठी दिनांक २७/०२/२०२५ रोजी गुरुवारी सायंकाळी ४:०० वाजता पुणे महानगरपालिका समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे राजेंद्र साळवे यांनी सांगितले.

आंदोलनात मांजरी बुद्रुक परिसरातील २०० पुरुष व २०० महिला सहभागी होणार आहेत. लेखी पत्र मिळेपर्यंत सदरचे आंदोलन मागे घेणार नाही.. तरी याची दखल घ्यावी अशी विनंती. राजेंद्र गोविंद साळवे. निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी नंदकिशोर जगताप पाणीपुरवठा प्रमुख पुणे महानगरपालिका यांना निवेदन देताना यावेळी राजेंद्र साळवे. सुनिता ढेकणे, श्रीमती सारिका प्रतापे, श्रीमती कल्याणी जगताप, पारूबाई भंडारी, मुद्रिका छगन भोसले, संगीता लोखंडे, सावित्रा सावंत, अनिता कुंभार व इतर नागरिक उपस्थित होते.

          नंदकिशोर जगताप पाणी पुरवठा प्रमुख पुणे महानगरपालिका

नंदकिशोर जगताप पाणी पुरवठा विभाग महानगरपालिका पुणे यांच्याशी या संदर्भात माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

निवेदनाची प्रत माहितीसाठी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे, पोलीस आयुक्त विशेष शाखा पुणे शहर पोलीस पुणे व पाणीपुरवठा प्रमुख पुणे मनपा यांना दिली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??