“जेएसपीएमचे जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम संपन्न”; हडपसर.

पुणे (हडपसर) : जयवंतराव सावंत इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी येथे गुरुवार २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘वि.वा.शिरवाडकर उर्फ ”कुसुमाग्रज” जयंती’ चे औचित्य साधून जेष्ठ लेखक व प्रबोधनकार प्रा. महादेव घोंगडे, सेवानिवृत्त सांगोला विद्यामंदिर जुनिअर कॉलेज सांगली यांच्या व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यांनी नित्तीमूल्य आणि त्यांचे प्रबोधन याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा देखील देण्यात आला आहे दरवर्षी हा दिवस आपल्या मायबोलीचा सन्मान करण्याचा आणि समृद्ध वर्षाला उजाळा देण्याचा म्हणून साजरा केला जातो. यावेळी त्यांनी कवी कुसुमाग्र यांच्या वाङमयीन कार्याबद्दल माहिती दिली. तसेच आपल्या लेखन प्रवासाबद्दल अनुभव कथन केले. साहित्याची निर्मिती प्रकिया त्यांनी उलघडून सांगितली . तसेच डॉ. विनोद कुलकर्णी सरांची उपस्थिती प्रमुख पाहुणे म्हणून लाभली होती.
आजचा हा कार्यक्रम जेएसपीएम हडपसर शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ. संजय सावंत डॉ. वसंत बुगडे यांच्या उपस्थितीत व मोलाच्या मार्गदर्शनाने पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर कार्याक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. त्यांनी आपल्या मनोगतात मानवी जीवनातील भाषेचं महत्व सांगितले तसेच त्यांनी मराठी भाषा ही आपली सांस्कृतिक ओळख टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि प्रेरित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन प्रमुख म्हणून प्रा. रविराज जाधव यांनी काम पाहिले. प्रथम व द्वितीय वर्ष डीफार्मसीच्या विद्यार्थ्यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या काव्यपंक्तीचे सादरीकरण केले व मराठी मायबोलीवरती भाषण केले.
कार्यक्रम संपन्न करण्यासाठी प्रा. अनुराधा पाटील , प्रा. स्वप्निल गाडेकर, प्रा. निकिता कोलते, प्रा. सागर सोनार प्रा. प्रगती लगदिवे, क्षितिजा डोंबाले, स्वाती माकोने, विवेक थोरात, प्रियंका महाजन, स्वप्नाली सावंत, ,पवार काका, यांनी सहकार्य केले. प्रा. अनुराधा पाटील यांनी आभार व्यक्त केले.



