शिवशाहीत बलात्कार करणारा हाच तो दत्ता गाडे, फोटो आला समोर..

पुणे : पुण्यातील शिवशाही बसमधील तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर एकच संताप व्यक्त केला जात आहे. शिवशाही बसमध्ये झालेल्या संतापजनक घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरु केली आहे. पुणे पोलिसांचे पथक आरोपीच्या घरी देखील पोहोचले आहेत.
दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव आहे. आता या नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो समोर आला आहे.
पुण्यातील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. २६ वर्षीय तरुणीवर बुधवारी पहाटे स्वारगेट एस टी डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील एसटी डेपोवर बुधवारी पहाटे ५.३० वाजता ही घटना घडली आहे. संतापजनक घटनेनंतर पोलिसांचे पथके आरोपीच्या मागावर आहेत.
पुणे पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याच्या भावाला ताब्यात घेण्या आलं आहे. पुणे पोलिसांचे पथक आरोपी दत्तात्रय गाडेच्या घरी दाखल झालं आहे. मात्र, आरोपी गाडे घरी नसून फरार आहे. पुणे पोलिसांनी गाडे याच्या शिरुर येथील घरावर छापा मारला आहे. गाडे याच्यावर पुण्यासह शिरूरमध्ये सुद्धा चोरी, हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके सुद्धा शोध घेत आहेत. आरोपी गाडे याचा फोटोही समोर आला आहे.
कोण आहे दत्तात्रय गाडे ?
पुण्यात शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधामाचं नाव दत्तात्रय गाडे आहे. दत्ता गाडे हा पुण्यातील सराईत गुन्हेगार आहेत. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यावर धमकी देणे, चेन स्नॅचिंग या सारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. दत्ता गाडे हा मूळचा शिरूरमधील आहे. त्याच्याविरोधात शिक्रापूर आणि शिरुर पोलिसांत नोंद आहेत. आरोपी दत्ता गाडे फरार आहे.



