
पुणे (हवेली) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार १०० दिवसांचा ७ कलमी कृती कार्यक्रमा अंतर्गत व राजस्व अभियाना अंतर्गत पुर्व हवेलीतील खालील शिवरस्ते खुले करणेत आले.
शासण निर्णय क्रमांक मग्रारो- २०२१/ प्र.क्र. २९/रोहयो-१०अ, दि. ११ नोव्हेंबर २०२१ अन्वये मा. उपविभागिय अधिकारी हवेली, उपविभाग पुणे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय रस्ता समिती गठित करणेत आली आहे. सदर समितीच्या बैठकीत शिव रस्ते खुले करणेबाबतचे प्रस्ताव सादर करण्यात आले.
खालील ग्रामपंचायतीने अप्पर तहसीलदार यांना रस्ते खुले करणेबाबत अर्ज केले असता स्थळ पाहणी करून रस्ते खुले करण्यात आले असल्याचे अप्पर तहसीलदार कोलते-पाटील यांनी सांगितले.
१) ग्रामपंचायत तरडे :- तरडे – कुंजीरवाडी शिवरस्ता अंदाजे लांबी ४ कि.मी
१) ग्रामपंचायत सोरतापवाडी :- सोरतापवाडी- तरडे शिवरस्ता अंदाजे लांबी ४ कि. मी
२) ग्रामपंचायत नायगाव व ग्रामपंचायत पेठः- नायगाव पेठ शिवरस्ता अंदाजे लांबी १.५ कि. मी
३) ग्रामपंचायत कोरेगाव मुळः- कोरेगाव मुळ उरुळीकांचण शिवरस्ता अंदाजे २ कि. मी
उपविभागिय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या तालुकास्तरीय समिती मध्ये सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने अपर तहसिल लोणीकाळभोर च्या तहसिलदार श्रीमती तृप्ती कोलते- पाटील यांनी समक्ष स्थळ पाहणी केली, असता त्यावेळी संबंधित गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक देखील उपस्थित होते.
यावेळी शिवरस्ते अडवणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधुन त्यांची बाजु ऐकुण घेऊन सामोपचाराने सदर अडविलेला रस्ता खुला करण्याबाबत आवाहन करण्यात आले व त्यानुसार उपअभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद ता. हवेली, जि. पुणे यांनी आवश्यक असल्यास उपअधिक्षक भुमीअभिलेख यांचेकडुन मोजणी करुन सदर शिवरस्त्याचे काम पूर्ण करुन घेऊन शिवरस्ते नागरिकांना वापरण्यास उपलब्ध करुन देणे यावेत अशा सुचना देणेत आल्या आहेत.



