जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

स्वारगेट बलात्कार घटनेचा महिला सुरक्षिततेची तिरडी काढून निषेध..

पुणे : स्वारगेटसारख्या गजबजलेल्या ठिकाणी सुरक्षा कक्षाच्या जवळ बलात्काराची घटना घडते याचा अर्थ सुरक्षा विभाग काय करत आहे?

एस.टी. महामंडळाकडे सुरक्षा विभाग पूर्ण कार्यक्षमतेने चालू राहावा इतकेही पैसे नाहीत का? ते नसतील तर सरकार ती तरतूद का करत नाही? असे खडे सवाल करत सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने लाडक्या बहिणींना एकवेळ पंधराशे रुपये दिले नाहीत तरी चालेल पण त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे यासाठी योग्य ती पावले उचलली पाहिजतेत, गुलाबो गँगच्या अध्यक्ष संगीता तिवारी यांनी बलात्कार घटनेचा निषेध व्यक्त करत परखडपणे संताप व्यक्त केला. पुण्यासारख्या आयटी हब-शिक्षणाचे माहेरघर, झपाट्याने विकसित होत असलेल्या शहरात स्वारगेटसारख्या गजबजटाच्या ठिकाणी नुकताच एका तरुणीवर बलात्कार झाला, त्या पार्श्वभूमीवर महिला जागर समिती, पुणे यांनी महिला सुरक्षिततेची तिरडी काढून तीव्र निषेध आंदोलन स्वारगेट सुरक्षा कक्ष ऑफिस, स्वारगेट बस डेपो येथे शनिवारी १ मार्च रोजी सकाळी १० वाजता आयोजित केले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.

अभिव्यक्तीच्या समन्वयक अलका जोशी म्हणाल्या की, आरोपीवर तातडीने गुन्हा नोंदवत ताबडतोब केस चालवून संबंधित महिलेला न्याय मिळालाच पाहिजे, तिला योग्य समुपदेशनही मिळाले पाहिजे या मागण्या आम्ही महिला जागर समितीकडून करत आहोत.

रस्ते सुरक्षित होणार कधी? भाजपा सरकार उत्तर द्या. सार्वजनिक ठिकाणं सुरक्षित होणार कधी? भाजपा सरकार उत्तर द्या, आम्हाला सुरक्षित वाटणार कधी? भाजपा सरकार उत्तर द्या, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

यावेळी अभिव्यक्ती संघटनेच्या समन्वयक अलका जोशी, गुलाबो गँगच्या सीमा महाडिक, सोनिया ओव्हाळ, रजिया बल्लारी, सामाजिक कार्यकर्त्या मृणालिनी वाणी, महिला जागर समितीच्या संगीता पटणे, रंजना पासलकर आणि स्त्री-पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??