जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

‘महिला दिनी’ हवालदार ललिता कानवडे यांचा गौरव… यशाच्या शिखरावर कशा पोहचल्या, जाणून घेऊयात..

पुणे ( हवेली) : महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा गौरव, कामगिरींना उजाळा देणे गरजेचे असल्याने त्यांच्या आयुष्यातील वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला.

हवालदार ललिता कानवडे सध्या लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत.

अनेकदा सबळ पुराव्याअभावी गुन्हेगार सहिसलामत सुटत असतात, परंतु त्यांनी प्रामाणिक पणे पोलीस खात्याची सेवा करत असताना पुरावे जमा करण्याचे पण जोखमीचे काम करतात. अशा एक तडफदार महिला पोलीस हवालदार ललिता कानवडे आहेत कि ज्यांनी साक्षीदार व न्यायालय यांच्यातील योग्य दुवा प्रामाणिकपणे साधला आहे.

त्यामुळेच की काय न्यायालयात साक्षीदारांसह भक्कम पुरावे सादर करून तब्बल २३ गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम आपल्या पोलीस खात्याच्या कार्यकाळात केलं आहे. गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरल्या आहेत. वेळोवेळी वरिष्ठांचे मार्गदर्शनाने त्यांना प्रेरणा मिळत गेली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेले लिंगदेव हे त्यांचे गाव. शेतकरी वडिल असलेले सिताराम कानवडे व आई मीराबाई यांच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांना चार बहिणी व एक भाऊ आहे. प्राथमिक शिक्षण गावातीलच लिंगेश्वर आदर्श विद्यालयात झाले. पुढे त्यांनी संगमनेर येथे कमवा व शिकवा पद्धतीने पदवीचे शिक्षण मोठ्या कष्टाने पूर्ण केले. दरम्यान सन २००६ ला पदवीच्या तृतीय वर्षाला असतानाच महाविद्यालयात तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांचे एक व्याख्यान झाले ललिता कानवडे त्या व्याख्यानाने प्रेरित झाल्या. तो क्षणच त्यांच्या आयुष्याचा खरा टर्निंग पॉईंट ठरला कारण आपणही पोलीस व्हावे असे त्यांनी स्वप्न पाहिले. केवळ स्वप्न पाहून त्या शांत बसल्या नाहीत, तर त्यांनी पोलिस होण्याचा ध्यासच घेऊन त्या दिशेने अभ्यास आणि सराव करायलाही सुरूवात केली.

ध्येयाला कष्ट, मेहनत आणि चिकाटीची जोड दिली की यश मिळतेच. ललिता कानवडे यांचेही तसेच झाले. आणि त्याच वर्षी पोलीस भरतीची परीक्षा देऊन अगदी पहिल्याच प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या. आणि आज हवालदार ललिता कानवडे या गावातील पहिल्या महिला पोलिस आहेत, याचा गावाला त्यांचा खूप अभिमान आहे.

पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्यावर हवालदार ललिता कानवडे २००६ साली पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलात रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी घराची जबाबदारी सांभाळून बहिण भावांना उच्च शिक्षण दिले. या दरम्यान, ललिता यांनी पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय, तंटामुक्ती अभियान, सीबीआय व वडगाव मावळ पोलीस ठाण्यात काम केले. दरम्यान २०१० साली त्यांचा संजय गडाख यांच्याही विवाह झाला. आज त्या दोन मुलींच्या आई आहेत.

पोलीस हवालदार ललिता कानवडे यांची चिकाटी, उत्साह, प्रेरणेने आणखी एक पोलीस खात्याची सेवा करण्यास सज्ज झाली. ती त्यांची लहान बहिण सुनीता कानवडे या पोलीस दलात कार्यरत झाल्या.

सेवा बजावत असताना लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ललिता कानवडे सन २०२१ साली रुजू झाल्या. त्यांच्याकडे पोलीस ठाण्यातील महत्वाचा विभाग आला. तो म्हणजे कोर्ट पैरवी किंवा समन्वय होय. त्यांनी या चार वर्षाच्या कालावधीत साक्षीदारांना न्यायालयात हजर होण्यासाठी समन्स बजावले. मोठ्या जिकिरीने साक्षीदार शोधून न्यायालयात हजर केले आहे. अनेक साक्षीदारांना धीर देण्याबरोबरच सुरक्षाही दिली आहे. याचबरोबर गुन्ह्यातील पुरावे व कागदपत्रे कौशल्यापूर्वक आणि जबाबदारीने न्यायालयात सादर केले आहेत. त्यामुळे खून, ममोका, बलात्कार, विनयभंग, पॉस्को, विवाहितेच्या आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या घटना व हाणामारी अशा घटनांतील २३ गुन्हेगारांना शिक्षा मिळाली आहे. त्यांच्या या कामगिरीची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, यांनी दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत तरंग या कार्यक्रमात पोलीस हवालदार ललिता कानवडे यांचा गौरव करण्यात आला.

ललिता कानवडे पुढे म्हणाल्या की नागरिकांना न्याय मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप समाधान वाटते. आपण काहीतरी चांगले काम केल्याची ती पोच पावती असते. अशा केसेससाठी साक्षीदार व पीडितांनी न्यायासाठी न्यायालयात हजर राहणे खूप महत्त्वाचे असते. पुढेही न्यायालयाच्या माध्यमातून सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वरिष्ठांची प्रेरणेने कामात उत्साह…

पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉ. राजेंद्रकुमार शिंदे, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचित, इतर कर्मचारी, पोलीस खात्यातील मैत्रीणी यांचे बहुमूल्य मार्गदर्शन व सहकार्य मिळाल्याचे त्या आवर्जून सांगतात.

अशा स्त्री शक्तीचा संन्मान, संसारातून, प्रामाणिक, समाजसेवा, देशसेवा करणार्या पोलीस हवालदार ललिता कानवडे यांना महिला दिना निमित्त द पाॅईट न्युज 24 करून मनपूर्वक शुभेच्छा..

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??