लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी यांचा ‘जागतिक महिला’ दिनानिमित्त सन्मान ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे..
सन्मान सोहळ्याचा व्हिडिओ पहा..

पुणे (हवेली) : (दि. ८) मार्च जागतिक महिला दिनानिमित्त लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे पोलीस महिला कर्मचारी यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
या सन्मान सोहळ्याला लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या पी एस आय रुपाली जाधव, पोलीस पाटील प्रियांका भिसे कदमवाकवस्ती, अॅड पिंकी राजगुरू, महिला पोलीस हवालदार ललिता कानवडे, हवालदार अश्विनी माळी, हवालदार दिपाली पाडुळे, हवालदार दिपीका थोरात, हवालदार निशा साळुंके/कोंडे, हवालदार ज्योती नवले, हवालदार अश्विनी पवार, हवालदार राणी खामकर, महिला पोलीस शिपाई कोमल आखाडे, शिपाई शिल्पा हरिहर, शिपाई वैशाली निकंबे, शिपाई लक्ष्मीबाई यादव, शिपाई वनिता यादव, शिपाई चंदा माने, शिपाई योगिता भोसुरे, शिपाई सरिता यादव, शिपाई मोहिनी चौधरी त्याच बरोबर महिला दक्षता कमीटीच्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नार्टन, कविता शेडगे, यावेळी उपस्थित होत्या. सर्व महिलांचा रोपे व पेन देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पी एस आय रुपाली जाधव, पोलीस पाटील प्रियांका भिसे कदमवाकवस्ती, अॅड पिंकी राजगुरू यांच्या शुभहस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना असे म्हणाले की १०९६ साली पोलीस खात्यात आल्यावर महिला पोलीसांची संख्या खुप कमी होती. त्यावेळी महिला या पोलीस खात्यात येण्यास तेवढ्या मानसिक दृष्ट्या सक्षम नव्हत्या महिला घराच्या बाहेर पडताना विचार करायच्या किंवा त्यांना पुरेसा पाठिंबा नव्हता. ती परिस्थिती तशी न राहता आज मात्र लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये जवळपास ३५ महिला कर्तव्य बजावत आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मला येऊन दिड महिना झालाय पण महिलांची कामगिरी जबरदस्त आहे. व पुढील काळात अशीच कामगिरी करतील अशी आशा बाळगतो. महिला पोलीस कर्मचारी उत्कृष्ट काम करत असल्याने कामाचा ताण कमी होत आहे. महिला पोलीस कर्मचारी यांचा अभिमान आहे.
अॅड पिंकी राजगुरू पुढे म्हणाल्या जागतिक महिला दिवस हा ८ मार्च १९०८ साली पुरुषां प्रमाणे महिलांना समान वेतन व्हावे यासाठी महिलेने मागणी केल्याने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन आयोजित केला जातो.
महिला पोलीस हवालदार ललिता कानवडे म्हणाल्या कि पोलीस खात्याची सेवा करत असताना सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पारदर्शक पणे काम करत राहिले. त्याचे फळ म्हणून की काय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तरंग च्या सन्मान सोहळ्यात सन्मान करण्यात आला.
जागतिक महिला दिनाच्या या कार्यक्रमात शाहिर महेश खुळपे यांनी सुत्रसंचालन केले. पोलीस महिला कर्मचारी यांना या कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रम संपन्न झाला.










