२३ मार्च २०२५ रोजी आंध्रप्रदेश (गुंटूर) येथे होणाऱ्या दहा वर्षाखालील राष्ट्रीय तिरंदाजी (आर्चरी) स्पर्धेसाठी चि.विजयकृष्ण यांची निवड… माळशिरस.

डॉ गजानन टिंगरे / पुणे
सोलापूर (माळशिरस) : माळशिरस तालुक्यातील लोहार गल्ली येथील चि.विजयकृष्ण थोरात यांने तिरंदाजीत नावलौकिक मिळवला.
माळशिरस येथील लोहार गल्लीतील पत्राच्या शेडमध्ये वास्तव्यास अंत्यत हालाखीत नवनाथ तानाजी थोरात यांनी त्यांचे शिक्षण बी काॅम, मराठी, हिंदी, इंग्रजी टायपिंग पूर्ण केले. शिक्षण घेतल्यानंतर नवनाथ यांना महर्षी शंकरराव सहकारी साखर कारखान्यात अकाऊंट म्हणून कामाला लागले.
त्यानंतर त्यांचा संसाराचा गाडा चालू झाला झाला स्वाती आणि नवनाथ यांच्या संसारात एक विजयकृष्ण या नावाचा एक रत्न झाला.
आज या चि. विजयकृष्ण या मुलाने स्वाती आणि नवनाथ यांच्या नावाला साजेशे असे यश संपादन केले. चि. विजयकृष्ण याने दहा वर्षाखालील गटात तिरंदाजीत यश संपादन करण्यास सुरवात केली. या यशाने हुळहळुन न जाता (दि.२३) मार्च रोजी आंध्रप्रदेश (गुंटूर) येथे होणाऱ्या दहा वर्षाखालील राष्ट्रीय तिरंदाजी (आर्चरी) स्पर्धेसाठी चि.विजयकृष्ण स्वाती नवनाथ थोरात याची वैयक्तिक प्रकार आणि महाराष्ट्र राज्याकडून सांघिक प्रकारासाठी निवड झाली.
या यशाने राज्याचे विद्यमान क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व पुढील राष्ट्रीय सामान्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुढील वाटचालीस दिल्या अनंत शुभेच्छा दिल्या.
दहा वर्षाखालील गटात तिरंदाजी प्रकारात इतकी छान प्रगती पहाता, त्यांनी सन २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलंपिक स्पर्धेमध्ये उत्कृष्ठ कामिगिरी करुन भारतास व देशासाठी सुवर्ण पदक पटकवणार अशी ईच्छा चि. विजयकृष्ण यानी व्यक्त केली.
सर्वसामान्य कुटूंबातून व ग्रामिण भागातून चि.विजयकृष्णच्या या यशाबद्दल क्रिडा, सामाजिक, राजकीय क्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे.
सत्कारा प्रसंगी यावेळी त्याचे प्रशिक्षक सुरज ढेंबरे, शेखर देवकर व निखिल गुरव व पालक नवनाथ थोरात, आई स्वाती थोरात, उपस्थित होत्या. सदरच्या यशात चि.विजयकृष्ण च्या प्रशिक्षकांचा मोलाचा वाटा आहे असे स्वाती व नवनाथ या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.



