आरोग्य

पुण्यात दूषित पाण्यामुळे वाढणाऱ्या Guillain-Barré Syndrome (GBS) च्या प्रकरणांवर त्वरित मोफत उपचार व जलप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांची मागणी ; काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे आयुक्तांना निवेदन..

पुणे : पुणे शहरातील विविध भागांमध्ये, विशेषतः सिंहगड रोड आणि परिसरातील ग्रामीण भागांमध्ये दूषित पाण्यामुळे Guillain-Barré Syndrome (GBS) या गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. राज्य आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत ६७ रुग्णांची नोंद करण्यात आली असून, त्यातील १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दूषित पाण्यात norovirus आणि campylobacter bacteria आढळल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या स्थितीत त्वरित आणि प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे. यासाठी आयुक्तांकडे पुढील मागण्या करण्यात आल्या.

१. GBS रुग्णांसाठी मोफत उपचार — सर्व रुग्णालयांमध्ये GBS रुग्णांसाठी मोफत उपचार व औषधोपचाराची तातडीने व्यवस्था करावी. उपचारासाठी लागणाऱ्या IVIG डोस आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

२. जलप्रदूषणाचा स्रोत शोधणे — दूषित पाण्याचा मूळ स्त्रोत ओळखण्यासाठी त्वरित जलतपासणी मोहीम हाती घ्यावी. नियमितपणे प्रभावित भागातील पाणीपुरवठा यंत्रणेचे निरीक्षण करावे.

३. प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई — जलप्रदूषणासाठी जबाबदार व्यक्ती, संस्था किंवा कारखान्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत आवश्यक पावले उचलावीत.

४. सुरक्षित पाणी पुरवठा — दूषित भागांमध्ये नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकर सेवा उपलब्ध करून द्यावी. पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन व फिल्टर सुविधा नागरिकांना वितरीत कराव्यात.

५. जनजागृती व आरोग्य तपासणी मोहीम — दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी. नियमित आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात.

पुण्याला “स्मार्ट सिटी” बनवण्यासाठी नागरी व्यवस्थेने तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे. जलप्रदूषणामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी आम्ही त्वरित कार्यवाहीची यावी. यावेळी या शिष्टमंडळात युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, ओबीसी विभागाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत सुरसे, पीएमटी चेअरमन शेखर कपोते, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सचिव चेतन अग्रवाल, अनिकेत सोनवणे उपस्थित होते.

यावेळी आयुक्तांनी संदर्भातली तपासणी करून योग्य त्या सूचना करण्याचे, त्वरित अंमलबजावणी करण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??