
पुणे (हवेली) : छत्रपती शिवरायांची जयंती पूर्ण भारतभर अभूतपूर्व उत्साहामध्ये साजरी केली जाते. महाराजांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे दर्शन यानिमित्ताने व्हावे यासाठी सर्व मंडळे पूर्णतः प्रयत्न करत असतात.
सालाबाद प्रमाणे राजे क्लब ट्रस्ट शेवाळवाडी यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १६ मार्च २०२५ रोजी शिवजयंती निमित्त शेवाळेवाडी, संपन्न होम्स सोसायटी समोर श्रीमंत केसरी प्रतिष्ठान च्या वतीने पौराणिक वांद्याचें सादरीकर, तसेच नितीन शेलार व सहकारी यांचे शिवकालीन युद्ध प्रात्यक्षिक होणार आहेत.
यांनतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांचे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या विषयावर व्याख्यान होणार आहे. बॉईज ४ मधील “काय सांगू राणी मला गाव सुटेना” हे गीत गणेश शिंदे यांनी लिहिले आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता गौरव मोरे व लागीर झाला जी फेम अभिनेता निखिल चव्हाण आवर्जून उपस्थित राहणार आहे.
पुरंदर हवेली मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार विजय बापू शिवतारे यांचा नागरी सत्कार शेवाळवाडी-मांजरी भागातील लाडक्या बहिणींच्या हस्ते होणार आहे. तसेच पुणे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, पुणे मनपा उपायुक्त प्रसाद काटकर, पुणे मनपा सहा. आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील, हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, फुरसुंगीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मंगल मोढवे, वाहतूक पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
शेवाळवाडी-मांजरी परिसरातील नागरिकांनी शिवजयंतीपर आयोजित कार्यक्रमांसाठी सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन राजे क्लब चे संस्थापक अध्यक्ष व शेवाळवाडी मा. उपसरपंच अमित पवार यांनी केले आहे.




